Calling Husband 'Hijra' Act of Cruelty: पॉर्न पाहण्याचे व्यसन असलेली पत्नी पतीला हिजडा म्हणायची; 'मानसिक क्रूरते'च्या आधारावर उच्च न्यायालयाची घटस्फोटाला मंजुरी

ती त्याच्यावर सेक्ससाठी दबाव टाकायची. एका रात्रीत 3 ते 4 वेळा सेक्स करण्यास भाग पाडायची.

High Court

Calling Husband 'Hijra' Act of Cruelty: घटस्फोटाच्या (Divorce) एका प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. न्यायालयाने म्हटले की, पत्नीने पतीला 'हिजडा' म्हणणे ही मानसिक क्रूरता आहे. न्यायमूर्ती सुधीर सिंग आणि जसजित सिंग बेदी यांच्या खंडपीठाने, 12 जुलै रोजी कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या बाजूने दिलेल्या घटस्फोटाच्या निर्णयाविरोधात पत्नीच्या अपीलावर सुनावणी करताना हे भाष्य केले. त्यानंतर उच्च न्यायालयाने घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला.

घटस्फोटाच्या याचिकेत पतीने आरोप केला होता की, त्याच्या पत्नीला पॉर्न आणि मोबाईल गेम्सचे व्यसन आहे. ती त्याच्यावर सेक्ससाठी दबाव टाकायची. एका रात्रीत 3 ते 4 वेळा सेक्स करण्यास भाग पाडायची. पतीने यास नकार दिल्यावर ती त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीवर भाष्य करायची, तसेच त्याला हिजडा म्हणून चिडवायची. आपल्या सासूने एका हिजड्याला जन्म दिला आहे असेही म्हणायची. अशा प्रकारच्या टिप्पण्या आपल्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवणाऱ्या आहेत, असे पतीने सांगितले. यासह पत्नीने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती, ज्यामुळे त्यांच्या नात्यात आणखी दुरावा निर्माण झाला, असा दावाही पतीने केला.

यावर टिप्पणी करताना न्यायमूर्ती सुधीर सिंग आणि न्यायमूर्ती जसजित सिंग बेदी यांच्या खंडपीठाने म्हटले की, पतीला 'हिजडा' म्हणणे आणि त्याच्या आईने अशा मुलाला जन्म दिल्याचा आरोप करणे अत्यंत क्रूर आहे. शब्दांच्या वापरामुळे नातेसंबंधांना किती नुकसान पोहोचते याकडे या प्रकरणाने न्यायालयाचे लक्ष वेधले. पतीच्या दाव्याची दाखल घेत, त्यांच्यातील संबंध सुधारण्यास कोणताही वाव उरलेला नाही, हे न्यायालयाने मान्य केले. (हेही वाचा; Jaipur Shocker: करवा चौथला उशिरा घरी परतल्याने नवरा-बायकोत भांडण; पत्नीने रेल्वेसमोर मारली उडी, तर पतीने गळफास घेत संपवले जीवन)

त्यानंतर उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत, अशा परिस्थितीत घटस्फोट घेणे योग्य असल्याचे सांगितले. महिलेच्या पतीवर करण्यात आलेल्या अवमानकारक आरोपांमुळे त्याला मानसिक त्रास झाला असल्याचेही न्यायालयाने मान्य केले. घटस्फोटाची याचिका मंजूर करताना न्यायालयाने नमूद केले, या प्रकरणात अतिशय गंभीर क्रौर्य करण्यात आले आहे. पत्नीने पतीला 'हिजडा' म्हटल्याने आणि आईला दोष दिल्याने नात्यातील दरी दुरुस्त करणे अशक्य आहे.