Virginity Test: MBA पदवीधर पतीकडून उच्चशिक्षीत पत्नीची कौमार्य चाचणी; धक्कादायक कृत्यामुळे खळबळ

या प्रकरणातील पती आणि पत्नी असे दोघेही बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ मास्टर (MBA) आहेत. तसेच, दोघेही नामांकीत कंपनीमध्ये काम करतात. दोघेही उत्तर कर्नाटक प्रदेशातील राहणारे आहेत. मॅट्रिमोनियल साइट (Matrimonial website) च्या माध्यमातून दोघे एकत्र आले. सुरुवातीची काही औपचारिक बोलणी आणि प्रक्रिया पार पाडल्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी विवाह केला.

indian--bride | (Photo courtesy: Wikimedia Commons)

देशातील हायटेक सिटी अशी ओळख असलेल्या बंगळुरु (Bengaluru) शहरातून धक्कादायक वृत्त आले आहे. येथील एका पत्नीने आपल्या पतीवर कौमार्य चाचणी (Virginity Test) करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा पती हा उच्चशिक्षीत आहे. त्याने व्यवस्थापन क्षेत्रातील बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ मास्टर (Master of Business Administration) ही पदवी घेतली आहे. एका उच्चशिक्षीत व्यक्तीकडून अशी अशी जबरदस्ती केली जाण्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पतीने आपल्याला कौमार्य चाचणीसोबतच जबरदस्तीने गर्भधारणा चाचणी केली असल्याचाही आरोप पत्नीने केला आहे.

पती,पत्नी दोघेही उच्चशिक्षित (MBA)

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, या प्रकरणातील पती आणि पत्नी असे दोघेही बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ मास्टर (MBA) आहेत. तसेच, दोघेही नामांकीत कंपनीमध्ये काम करतात. दोघेही उत्तर कर्नाटक प्रदेशातील राहणारे आहेत. मॅट्रिमोनियल साइट (Matrimonial website) च्या माध्यमातून दोघे एकत्र आले. सुरुवातीची काही औपचारिक बोलणी आणि प्रक्रिया पार पाडल्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी विवाह केला. हा विवाह होण्यापूर्वी 15 दिवस आगोदर पत्नीच्या आईचे निधन झाले होते. (हेही वाचा, Virginity Test: पुढारलेल्या पुण्यात पुन्हा एकदा नववधूंची ‘कौमार्य’चाचणी; शहरातील उच्चभ्रू परिसरातील घटना)

पत्नीला अंधारात ठेऊन केली कौमार्य चाचणी (Virginity Test)

आईच्या निधनानंतर पत्नी नैराश्येत (Depression) गेली. मात्र, तिच्या आवस्थेचा चुकीचा अर्थ पतीने काढला. त्याला वाटले की पत्नी आपल्यासोबतच्या लग्नाबाबत खुश नाही. ही घटना विवाहाच्या दुसऱ्या दिवशी घडली. पत्नीला (पीडिता) ओकाऱ्या (उलटी) होऊ लागल्या. पोटात गॅस आणि अॅसिडीटी झाल्यामुळे पत्नीला उलटीचा त्रास होऊ लागला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे तिझी गर्भधारणा चाचणी (प्रेग्नंन्सी टेस्ट) आणि कौमार्य चाचणी करण्यात आली. आपल्यावर झालेल्या चाचणीबाबत पीडितेला जेव्हा माहिती कळाली तेव्हा तिला एकच धक्का बसला. आपल्यावरील टेस्ट करण्यास सहमती देणाऱ्या पत्रावर आपण ते वाचताच सह्या केल्या होत्या, असा दावाही पीडितेने केलाआहे.

कौटुंबीक सल्ला आणि मार्गदर्शन केंद्रातील अधिकाऱ्यांना धक्का

आपल्यावर झालेल्या टेस्टबाबत माहिती कळताच पीडिता पतीवर रागावून आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी गेली. त्यानंतर तिन महिन्यांनी आरोपी पतीने तिच्याकडे घटस्फोटासाठी अर्ज आणि कागदपत्रं पाठवून दिली. दरम्यान, कौटुंबीक सल्ला केंद्रात समुपदेशाकाने पीडितेला बोलावले. तिथे पीडितेने आपल्यासोबत घडलेली कैफियत सांगितली. जी ऐकूण केंद्रातील समुपदेशक आणि इतर अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.

आरोपी पतीविरोधात न्यायालयात चालणार खटला

दरम्यान, पीडितेच्या आग्रहावरुन आपण पतीसोबत संवाद साधण्यासाठी संपर्क केला. मात्र, त्याच्याकडून कोणतेही उत्तर अथवा प्रतिसाद आला नाही, असेही टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. आपल्या आईच्या निधनाचा धक्का बसल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी पतीकडून आपल्याला कोणताही भावनिक आधार मिळाला नाही. तसेच, आवश्यक ते वैद्यकीय आणि मानसिक उपचार करण्याबाबतही पतीने कोणतीही तत्परता दाखवली नाही, असा आरोप करत पीडित पत्नीने आता पतीविरोधात पोलीसात तक्रार केली आहे. न्यायालयात आता पतीविरोधात कौटुंबीक छळ आणि विश्वासावर संशय घेतल्याच्या आरोपाखाली खटला चालवला जाणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now