Bank Holidays April 2023: एप्रिल महिन्यात एकूण 15 दिवस बँका राहणार बंद; RBI ने जारी केली सुट्ट्यांची यादी

त्यामुळे बँकिंगचे कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यापूर्वी एप्रिलमधील बँकेच्या सुट्टीची यादी नक्कीच तपासा.

Bank Holidays | Image used for representational purpose (Photo Credit: PTI)

Bank Holidays April 2023: 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस एप्रिल महिना विशेष महत्त्वाचा आहे. मात्र, एप्रिल महिन्यात अनेक बँकांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे बँकिंगचे कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यापूर्वी एप्रिलमधील बँकेच्या सुट्टीची यादी नक्कीच तपासा. बँका बंद असल्याने ग्राहकांना अडचणी येऊ नयेत म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी करते. सण, वर्धापनदिन आणि शनिवार व रविवार यामुळे आलेल्या सुट्ट्यांसह एप्रिलमध्ये एकूण 15 बँक सुट्ट्या आहेत. महावीर जयंती, गुड फ्रायडे आणि आंबेडकर जयंती आदी, सणांमुळेल बँका या दिवशी बंद राहणार आहेत.

बँकेच्या सुट्ट्यांमुळे व्यत्यय येऊ शकतो, परंतु नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग यासारख्या ऑनलाइन सुविधा कार्यरत राहतात. ज्यामुळे ग्राहकांना खात्यांमध्ये व्यवहार करता येतो. UPI हा देखील सोपा मार्ग आहे. चेक जमा करणे किंवा पैसे काढणे यासारख्या बँकिंग ऑपरेशन्समध्ये कोणतीही समस्या टाळण्यासाठी, RBI द्वारे प्रदान केलेल्या बँक सुट्ट्यांची यादी तपासा. (हेही वाचा -Indian Railways Train Ticket: खुशखबर! रेल्वे प्रवास झाला स्वस्त; AC3 इकॉनॉमी कोचमध्ये बुकिंग करण्यासाठी तुम्हाला द्यावा लागेल कमी भाडे)

एप्रिल 2023 मधील बँक सुट्ट्यांची यादी -

जर तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे एप्रिल महिन्यात पूर्ण करणार असाल. तर एप्रिल महिन्यातील बँकांच्या या सुट्ट्यांची यादी तुम्ही जरूर पहा. अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.