Bank Holidays in July 2024: पुढीच्या महिन्यात एकूण 12 दिवस बंद राहणार बँका; महत्वाची कामे पूर्ण करायची असतील तर जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते. जुलै 2024 बद्दल बोलायचे झाले तर बँका एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत. जुलैमध्ये बँका कोणत्या तारखेला बंद राहतील ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Bank Holidays in July 2024 (PC - File Image)

Bank Holidays in July 2024: आजकाल बँकिंगची बहुतांश कामे ऑनलाइन केली जातात. बँकेच्या मोबाइल ॲपवर सेवांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. पण तरीही कर्ज घेण्यासारखी अनेक कामे आहेत, ज्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते. पण जर तुम्ही बँकेच्या शाखेत गेलात आणि बँक बंद असेल तर? तुमचे काम थांबेल आणि तुमचा वेळही वाया जाईल. हे टाळण्यासाठी, तुमची बँक कधी बंद असेल? हे तुम्हाला आधीच माहित असले पाहिजे.

दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी (Bank Holidays) असते. जुलै 2024 बद्दल बोलायचे झाले तर बँका एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत. जुलैमध्ये बँका कोणत्या तारखेला बंद राहतील ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (हेही वाचा -Rule Change From 1st July 2024: 1 जुलैपासून होणार आहेत 'हे' 5 मोठे बदल; किचनपासून बँक खात्यापर्यंत दिसेल या बदलाचा परिणाम!)

जुलैमध्ये या तारखांना बँकांना असणार सुट्टी -

3 जुलै 2024: Behdienkhlam मुळे, शिलाँग झोनमधील बँकांना सुट्टी असेल.

6 जुलै 2024: एमएचआयपी दिनानिमित्त आयझॉल झोनमधील बँकांना सुट्टी असेल.

7 जुलै 2024: रविवारमुळे देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

8 जुलै 2024: कांग (रथजत्रा) मुळे इम्फाळ झोनमधील बँकांना सुट्टी असेल.

9 जुलै 2024: Drukpa Tshe-zi मुळे, गंगटोक झोनमधील बँकांना सुट्टी असेल.

13 जुलै 2024: दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

14 जुलै 2024: रविवारमुळे देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

16 जुलै 2024: हरेलामुळे डेहराडून झोनमधील बँकांना सुट्टी असेल.

17 जुलै 2024: मोहरममुळे जवळपास संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल.

21 जुलै 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

27 जुलै 2024: चौथ्या शनिवारमुळे बँकेला सुट्टी असेल.

28 जुलै 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

सुट्टीच्या यादीतील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय स्तराच्या आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. त्याच वेळी, काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तराच्या असतात. त्या दिवशी बँकेच्या शाखा फक्त त्याच्याशी संबंधित राज्यांमध्येच बंद असतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now