Bank Holidays in May 2024: मे महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका; पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी
आरबीआयच्या यादीनुसार मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार आहेत.
Bank Holidays in May 2024: बँक वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर ते त्वरित पूर्ण करा कारण पुढील महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने मे महिन्याच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. आरबीआयच्या यादीनुसार मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार आहेत.
यामध्ये विविध राज्यांमध्ये येणारे अनेक सण तसेच साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. बँक बंदमुळे चेकबुक आणि पासबुकसह अनेक कामांवर परिणाम होऊ शकतो. मात्र ऑनलाइन सेवा सुरू राहणार आहेत. दरम्यान, 27 एप्रिलला महिन्याच्या चौथ्या शनिवारी आणि 28 एप्रिलला रविवारी बँका बंद राहतील. मे महिन्यात बँका कोणत्या तारखेला बंद राहणार आहेत ते जाणून घेऊयात. (हेही वाचा - Voter ID Card Application: मतदार कार्ड साठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज कसा कराल? पहा आवश्यक कागदपत्रं ते स्टेटस कसं तपासाल?)
मे महिन्यात या दिवशी बँका बंद राहणार -
1 मे- महाराष्ट्र दिन/कामगार दिन (बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, आंध्र प्रदेश, तेलंगणा, इम्फाळ, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा, तिरुवनंतपुरम येथे 1 मे रोजी बँका बंद राहतील.)
5 मे-रविवार (रविवारी सर्व राज्यांमध्ये सर्व बँका बंद राहतील.)
8 मे- रवींद्रनाथ टागोर जयंती (यानिमित्त कोलकात्यातील सर्व बँका बंद राहतील.)
10 मे- बसव जयंती/अक्षय तृतीया (या निमित्ताने बेंगळुरूमध्ये सर्व बँका बंद राहतील.)
11 मे- दुसरा शनिवार (सर्व बँका बंद राहतील.)
12 मे ते रविवार (सर्व बँका बंद राहतील.)
16 मे- राज्यत्व दिन (या निमित्ताने गंगटोकमध्ये सर्व बँका बंद राहतील.)
19 मे- रविवार (सर्व बँका बंद राहतील.)
20 मे- लोकसभा निवडणूक (यानिमित्त बेलापूर आणि मुंबईत सर्व बँका बंद राहतील.)
23 मे- बुद्ध पौर्णिमा (यानिमित्त आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, जम्मू, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथे सर्व बँका बंद राहतील.)
25 मे 2024 - चौथा शनिवार
26 मे ते रविवार (सर्व बँका बंद राहतील.)
बँक सुट्ट्यांमध्ये ग्राहक ऑनलाइन सेवा वापरू शकतात, कारण UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांवर बँक सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होत नाही. युजर्स UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतात. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता. तुम्ही तुमचे काम नेट बँकिंग, एटीएम, डिजिटल पेमेंटद्वारेही करू शकता. बँका बंद असूनही, ग्राहक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे सहज पेमेंट करू शकतात. तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.