Bank of Maharashtra Recruitment 2021: बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदांसाठी भरती जाहीर; 6 एप्रिल पूर्वी bankofmaharashtra.in वर करा ऑनलाईन अर्ज
दरम्यान निवडल्या जाणार्या उमेदवारांना भारतामध्ये कोठेही शाखा प्रबंधक / अधिकारी म्हणून नियुक्त केली जाणार आहे.
बॅंकेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आता एक खूषखबर आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनरल ऑफिसर पदासाठी ही भरती होणार आहे. याबाबतचे एक नोटीफिकेशन प्रकाशित करण्यात आले आहे. दरम्यान इच्छुक उमेदवार या नोकरभरतीसाठी महाराष्ट्र बॅंक च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. तर अर्ज दाखल करण्यासाठी bankofmaharashtra.in ला भेट द्यावी लागणार आहे. 22 मार्चपासून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण यासाठी अंतिम मुदत 6 एप्रिल 2021 पर्यंत आहे.
पॅन इंडिया च्या आधारे एकूण 150 रिकाम्या जागांवर जनरल ऑफिसर स्केल 2 साठी ही नोकरभरती होणार आहे. दरम्यान निवडल्या जाणार्या उमेदवारांना भारतामध्ये कोठेही शाखा प्रबंधक / अधिकारी म्हणून नियुक्त केली जाणार आहे. दरम्यान शॉर्ट लिस्टेट उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे. RSRS 2021: राज्य सभा सचिवालयात इंटर्नशिप आणि फेलोशिपसाठी संधी, येत्या 31 मार्च पर्यंत करता येणार अर्ज.
रिक्त जागा आरक्षणानुसार
जनरल ऑफिसर स्केल 2- 150 पदं
एससी - 22
एसटी- 11
ओबीसी - 40
ईडब्लूएस - 15
यूआर - 62
दरम्यान शैक्षणिक पात्रता पाहता उमेदवार सार्या सिमेस्टर मध्ये 60% सह पदवीधर असावा.JAIIB आणि CAIIB उत्तीर्ण असावे. प्रोफेशनल कोर्स मध्ये क्वालिफिकेशन असावं. तर पदवीधर मार्क्समध्ये SC / ST / OBC / PwBD या आरक्षणांचा फायदा घेणार्यांना 55% गुण आवश्यक आहे.
बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदासाठी अर्ज करणार्यांची वयोमर्यादा ही 25 ते 35 वर्ष असणं आवश्यक आहे. तर यूआर / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांना 1180 रूपये शुक्ल आकारला जाणार आहे तर एसटी, एससी यांना 118 रूपये फी भरून अर्ज करता येणार आहे.