Bank of India Recruitment 2020: सरकारी नोकरीची संधी, बँक ऑफ इंडिया भरणार रिक्त 200 जागा, पगार, पात्रता, अर्ज यांविषयी घ्या जाणून

त्यासाठी पात्रता निकष, वयोमर्यादा, अनुभव, निवड निकष आणि बँक ऑफ इंडिया भरती संबंधित इतर तपशीलांची तपासणी करू अर्ज करणे आवश्यक आहे.

Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

बँकिंग क्षेत्रात नोकरी ( Government Job) करु इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे. बँक ऑफ इंडिया (BOI) आपली रिक्त असलेली सुमारे 200 पदं भरणार आहे. ही पद विविध श्रेणी आणि आर्हतेनुसार भरली जाणार आहेत. प्रामुख्याने ही पदं Credit Officer आणि इतर प्रकारची आहेत. त्यामुळे बँक ऑफ इंडियाने ((Bank of India ) या पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. तुम्ही जर बँक ऑफ इंडिात नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही अर्ज करु शकता. हे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार येथे पात्रता निकष, वयोमर्यादा, अनुभव, निवड निकष आणि बँक ऑफ इंडिया भरती (Bank of India Recruitment 2020) संबंधित इतर तपशीलांची तपासणी करू शकतात.

बँक ऑफ इंडिया भरती 2020: अर्ज करण्याची शेवटची तारीख

उमेदवार 16 सप्टेंबरपासून ऑनलाईन बीओआय भरती 2020 (BOI Recruitment 2020) साठी अर्ज करू शकतील. पदांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे.

एकूण रिक्त पदे आणि पदनाम आणि एकूण जागा

वेगवेगळ्या पदांवर पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार bankofindia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करु शकतात. रिक्त पदांची एकूण संख्या - 241 इतकी आहे. पदांचा तपशील खालीलप्रमाणे

Economist- 4 Posts

Statistician- 2 Posts

Risk Manager- 9 Posts

Credit Analyst- 60 Posts

Credit Officers - 79 Posts

IT (Fintech) - 30 Posts

IT (Data Scientist) - 12 Posts

IT (Info. Security) - 8 Posts

Tech Appraisal- 10 Posts

निवड प्रक्रिया

अर्जदार / पात्र उमेदवारांच्या संख्येवर अवलंबून बँक ऑफ इंडियामधील विविध पदांची निवड ऑनलाइन चाचण्या आणि / किंवा जीडी आणि / किंवा वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल. ऑनलाईन परीक्षेत इंग्रजी, व्यावसायिक ज्ञान, बँकिंग उद्योगासंदर्भात जनरल अवेयरनेसचे प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांचा आहे आणि एकूण गुण175 आहेत. इंग्रजी भाषेची परीक्षा वगळता वरील चाचण्या द्विभाषिक उपलब्ध असतील, म्हणजे इंग्रजी आणि हिंदी.

वयोमर्यादा

उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी किंवा नोकरीस पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे असने आवश्यक आहे. वरिष्ठ पातळीवरील पदांसाठी उमेदवारांचे वय 38 पेक्षा अधिक नसावे. मध्यम व कनिष्ठ पातळीवरील पदांसाठीवय 35 आणि 32 वर्षे इतके मर्यादित आहे. (हेही वाचा, ठाणे महानगरपालिकेत नर्स पदासाठी मोठी भरती; सरकारी नोकरीसाठी येथे करा अर्ज)

वेतन

कनिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील नोकरीसाठी किंवा ग्रेड -1 मधील नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 42,020 रुपये / ग्रेड II, III आणि IV दर्जाच्या पदांसाठी मासिक वेतन अनुक्रमे 45,950 रुपये, 51,490, रुपये आणि 59,170 रुपये इतके असणार आहे.

अर्ज शूल्क: अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवार - रु. 175 असणार आहे. तर इतर सर्व वर्गांसाठी 850 रुपये इतके असणार आहे.

वरील माहितीच्या आधारे खातरजमना करुन इच्छुक व पात्र उमेदवार बँक ऑफ इंडियाकडे ऑनलाईन अर्ज नोंदणी करु शकतात. त्यासाठी पात्रता निकष, वयोमर्यादा, अनुभव, निवड निकष आणि बँक ऑफ इंडिया भरती संबंधित इतर तपशीलांची तपासणी करू अर्ज करणे आवश्यक आहे.