Amazon च्या वेबसाईट आणि अॅपवरही IRCTC च्या तिकीट बुकींगची सुविधा; पहा, कसे कराल ऑनलाईन तिकीट बुकींग?
रेल्वे तिकीट बुकींगची प्रक्रीया आता अधिक सुकर झाली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने अॅमेझॉन इंडियासोबत हातमिळवणी केल्यामुळे आता रेल्वेचे तिकीट बुक तुम्ही अॅमेझ़ॉनच्या वेबसाईट आणि अॅपवरुनही करु शकता.
भारतीय प्रवाशांसाठी आनंददायी बातमी आहे. रेल्वे तिकीट बुकींगची प्रक्रीया आता अधिक सुकर झाली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (Indian Railway Catering and Tourism Corporation) अॅमेझॉन इंडियासोबत (Amazon India) हातमिळवणी केल्यामुळे आता रेल्वेचे तिकीट बुक तुम्ही अॅमेझ़ॉनच्या वेबसाईट आणि अॅपवरुनही करु शकता. अॅमेझॉनच्या वेबसाईट आणि अॅपवर रेल्वे तिकीट बुकींगचे फिचर उपलब्ध आहे. लवकरच हे फिचर आयओएस (iOS) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल, असे कंपनीने प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले. या नव्या सोयीमध्ये वन क्लिक पेमेंट यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसंच एक्स्ट्रा सर्व्हिस चार्जही आकारण्यात येणार नाही. कॅशबॅक ऑफर्सही दण्यात येणार आहेत. प्रथम बुकींगवर प्राईम मेंबर्ससाठी (Prime Members) 120 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. तर नॉन प्राईम मेंबर्ससाठी (Non-Prime Members) 100 रुपयांपर्यंत 10% सूट देण्यात येईल. (IRCTC तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या IIT खडगपुरच्या माजी विद्यार्थ्याला RPF कडून अटक)
Amazon India वर ट्रेन तिकीट कसे बुक कराल?
- amazon.in वेबसाईटला भेट द्या किंवा अॅप ओपन करा.
- Amazon Pay टॅबवरुन ट्रेन/ट्रॅव्हल कॅटेगरी सिलेक्ट करा.
- इतर तिकीट बुकींग प्रोर्टल प्रमाणेच येथे देखील, प्रवासाची तारीख, पोहचण्याचे ठिकाण इत्यादी माहिती भरा.
- अॅमेझॉन पे बॅलन्स किंवा इतर डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून पेमेंट करा.
- तिकीट कॅन्सल करण्याचा पर्यायही येथे देण्यात आला आहे. त्यासाठी 'Your Orders' पर्यायाचा वापर करुन तुम्ही तिकीट्स रद्द करु शकता.
दरम्यान, तिकीट बुक करताना सर्व क्लासच्या ट्रेन्ससाठी सीट, कोटा तुम्ही चेक करु शकता. तिकीट डाऊनलोडही करता येईल. तसंच PNR स्टेटसही प्रवाशांना तपासता येईल.
ऑफरचा लाभ कसा घेता येईल?
# Amazon.in वर ट्रेन तिकीट्स पर्यायावर जा.
# गरजेनुसार ट्रेनची निवड करा.
# पेमेंट सेक्शन पेजवर valid the offer सिलेक्ट करा. (आधीपासून सिलेक्ट केलेली नसल्यास)
# बुकींग डिटे्ल्स चेक करुन तुमचे पेमेंट करा.
अॅमेझॉनवरुन तिकीट बुकींग केल्यावर 3 दिवसांच्या आत अॅमेझॉन पे बॅलन्स मध्ये कॅशबॅकची रक्कम जमा होईल. 29 सप्टेंबर 2020 ते 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत ही ऑफर व्हॅलिड आहे. या ऑफरच्या काळामध्ये प्रत्येक युजरला फक्त एकदाच या ऑफरचा लाभ घेता येईल. ही लिमिटेड पिरेड ऑफर अॅमेझॉन पे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत देण्यात आली असून www.amazon.in, अॅमेझॉन मोबाईल वेबसाईट आणि अॅमेझॉन मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे..