ATF Price Hike: हवाई प्रवास महागला, एटीएफच्या किंमतीत 5 टक्क्यांनी वाढ

अशाप्रकारे, गेल्या काही महिन्यांत एटीएफची किंमत 29,391.08 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे.

Flight | Representational image (Photo Credits: pxhere)

ATF Price Hike: सरकारने 1 ऑक्टोबर 2023 जेट इंधनाच्या म्हणजेच एटीएफच्या किमतीत (ATF Price) 5 टक्के वाढ केली आहे. या वाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत ATF ची किंमत 5,779.84 रुपये प्रति किलोलीटरने वाढून 1,18,199.17 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. यापूर्वी, ATF ची किंमत सरकारने 1 सप्टेंबर रोजी 14.1 टक्के किंवा 13,911.07 रुपये प्रति किलोलीटरने आणि ऑगस्टमध्ये 8.5 टक्के किंवा 7,728 रुपये प्रति किलोलीटरने वाढवली होती.

दरम्यान, जुलैमध्ये जेट इंधनाच्या किमतीत 1.65 टक्के किंवा 1,476.79 रुपये प्रति किलोलीटरने वाढ झाली होती. अशाप्रकारे, गेल्या काही महिन्यांत एटीएफची किंमत 29,391.08 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे. (हेही वाचा - New Rules from 1st October 2023: डेबिट-क्रेडिट कार्ड नेटवर्कसह ऑनलाइन गेमिंग संदर्भात बदलले 'हे' नियम; तुमच्या खिशावर 'असा' होणार परिणाम)

व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ -

एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती पहिल्या ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर 200 रुपयांनी वाढले आहेत. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या वाढीनंतर दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 209 रुपयांनी वाढून 1731.50 रुपयांवर पोहोचली आहे, तर आधी 1522.50 रुपयांना मिळत होती. त्याच वेळी, कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 203.50 रुपयांच्या वाढीमुळे 1636 रुपयांवरून 1839.50 रुपयांवर पोहोचली आहे.

याशिवाय, मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 202 रुपयांनी वाढून 1684 रुपयांवर पोहोचली आहे. आधी 1482 रुपयांना विकले जात होते. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 203 रुपयांनी वाढली असून, त्यामुळे किंमत 1898 रुपयांवर पोहोचली आहे. पूर्वी तो 1695 रुपये होता.

तथापी, सप्टेंबरमध्ये सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता. यानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत सुमारे 158 रुपयांनी कमी होऊन 1522.50 रुपये झाली आहे.