Aadhar Update : काय आहे Masked Aadhar? कसे डाउनलोड कराल या नव्या फीचरसह तुमचे आधार कार्ड?
या नव्या फीचरमुळे आता तुमचा 12-अंकी आधार क्रमांक कव्हर करण्यात येईल, ज्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज भासणार नाही.
What is Masked Aadhar? आधार कार्ड म्हणजे आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचे ओळख पत्र बनले आहे. तरीही अनेक लोक आपल्या आधार कार्डवर असलेली माहिती कोणाशीही पटकन शेअर करताना घाबरतात. त्यामुळे, तुम्ही जर तुमच्या आधार कार्डवर असलेल्या माहितीच्या सुरक्षिततेबद्दल तुम्ही काळजीत असाल तर, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ने 'मास्क्ड आधार' (Masked Aadhar) नावाचे एक नवे फीचर आणले आहे. या नव्या फीचरमुळे आता तुमचा 12-अंकी आधार क्रमांक कव्हर करण्यात येईल, ज्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज भासणार नाही.
त्यामुळे यापुढे जर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक कोणाशी शेअर करायचा नसेल, तर हे फीचर नक्कीच फायदेशीर ठरेल. यूआयडीएआयने ऑफर केलेल्या मास्क्ड आधार या नव्या सुविधेसह तुम्ही आता यूआयडीएआयच्या वेबसाइटवरून मास्क्ड असलेले ई-आधार कार्ड डाउनलोड करू शकता. विशेष म्हणजे ई- केवायसीसाठी मास्क्ड असलेले आधार वापरले जाऊ शकते कारण त्यासाठी आधार क्रमांक शेअर करणे आवश्यक नसते.
आपण मास्क्ड आधार कार्ड असे डाउनलोड करू शकता (How to download Masked Aadhar) -
यूआयडीएआय वेबसाइटला भेट द्या (https://uidai.gov.in/).
My Aadhaar पर्याय निवडा.
'My Aadhaar' अंतर्गत 'Download Aadhaar' वर क्लिक करा.
ई-आधार डाउनलोड करण्यासाठी 3 पर्याय आहेत.
अ. आधार क्रमांक
ब. नावनोंदणी आयडी (EID)
क. व्हर्च्युअल आयडी (व्हीआयडी)
या सर्व पर्यायांमध्ये 'I want a masked Aadhaar' असे चेक बॉक्स आहेत. त्यावर क्लिक करा.
Send OTP बटणावर क्लिक करा. आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल.
वेबसाइटवर आपला ओटीपी एंटर करा
पॅनकार्डसाठी अर्ज करताना या चुका टाळा; अन्यथा होईल मोठे नुकसान
मास्क्ड आधार कार्ड फीचरनुसार, आपल्याला आपल्या आधार क्रमांकाचे पहिले 8-अंक मास्क म्हणजेच लपवता येऊ शकतात. मात्र शेवटचे 4 अंक मात्र लपवता येत नाहीत. आपण या नव्या फीचरचा वापर करत आपल्या आधार कार्डची कॉपी डाउनलोड कराल तेव्हा आपला फोटो, क्यूआर कोड, डेमोग्राफिक माहिती आणि इतर तपशील मात्र त्यावर अधिसारखेच उपलब्ध असतील. तसेच या डिजिटली कॉपी वर आपली स्वाक्षरी देखील असेल. तसेच जिथे केवळ ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड दाखवायचे आहे तिथेच ही कॉपी वापरली जाऊ शकते.