Aadhaar Free Update Last Date: आधार अपडेट केले काय? लवकर करा, विनामूल्य सेवा होणार बंद; जाणून घ्या अंतिम तारीख
ते मोफत अपडेट करण्याची मुदत 14 सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानंतर ते अपडेट केल्या तुम्हाला 50 रुपये दंड लागू शकतो.
Aadhaar Online Update: आधार कार्ड काढले आहे, पण त्याला आता 10 वर्षे उलटून गेली आहेत. असे असेल तर ते तत्काळ अद्यावत करणे आवश्यक आहे. म्हणजेच ते अपडेट (Aadhaar Update) करुन घ्यायला हवे. अन्यथा तुम्हाला तांत्रिक अडचणी आणि दंडही भरावा लागू शकतो. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने जाहीर केले आहे की, ज्या आधार कार्डधारकांनी गेल्या दहा वर्षांत त्यांचे आधार अपडेट केले नाहीत, त्यांनी 14 सप्टेंबरपर्यंत ओळख (Proof of Identity) आणि पत्त्याची कागदपत्रे (Proof of Address) पुनर्वैधीकरणासाठी प्रदान करणे आवश्यक आहे. निश्चित तारखेपर्यंत तुमचे कार्ड अद्ययावत केले तर तुम्हाला ती सेवा विनामुल्य मिळू शकते. मात्र, त्यानंतर केल्या जाणाऱ्या आधार अपडेटसाठी (अद्ययावत) 50 रुपये इतका दंड आकारला जाईल.
आधार अपडेट करणे का महत्त्वाचे?
सेंट्रल आयडेंटिटीज डेटा रिपॉझिटरी (CIDR) मधील तपशील अचूक आहेत याची खात्री करण्यासाठी आधारचे पुनर्प्रमाणीकरण महत्त्वाचे आहे. आधार प्रमाणीकरणामध्ये पडताळणीसाठी UIDAI च्या डेटाबेसमध्ये लोकसंख्याशास्त्रीय किंवा बायोमेट्रिक माहितीसह आधार क्रमांक सबमिट करणे याचा समावेश आहे. (हेही वाचा, Adorable Aadhaar Photoshoot: आधार कार्डसाठी फोटो काढताना मॉडेलींग, नेटीझन्सना आठवली 'Parle G Girl', चिमूकलीचा फोटो व्हायरल (Watch Video))
आधार ऑनलाइन अपडेट करण्यासाठी महत्त्वाच्या पायऱ्या
अपडेट प्रक्रिया सोपी करण्यासाठी, UIDAI ने ऑनलाइन पद्धत सक्षम केली आहे. तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करा:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: त्यासाठी myaadhaar.uidai.gov.in किंवा https://myaadhaar.uidai.gov.in वर जा आणि तुमचा आधार क्रमांक आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला OTP वापरून लॉग इन करा.
- तुमच्या तपशीलांचे पुनरावलोकन करा (Review your details): तुमच्या प्रोफाइलमध्ये प्रदर्शित केलेली ओळख आणि पत्त्याचे तपशील तपासा.
- अचूकता सत्यापित करा (Verify accuracy): सर्व तपशील बरोबर असल्यास, ‘मी सत्यापित करतो की वरील तपशील बरोबर आहेत’ या पर्यायावर क्लिक करा.
- पडताळणी दस्तऐवज निवडा (Select verification documents): ड्रॉप-डाउन मेनूमधून, तुम्ही ओळख आणि पत्ता पडताळणीसाठी सबमिट कराल ते दस्तऐवज निवडा.
- दस्तऐवज अपलोड करा (Upload documents): प्रत्येक फाइल 2 MB पेक्षा कमी आणि JPEG, PNG किंवा PDF फॉरमॅटमध्ये असल्याची खात्री करा.
- माहितीचे पुनरावलोकन केल्यानंतर, तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुमचे तपशील सबमिट करा. (हेही वाचा, Verification Compulsory For These Aadhaar: 18 वर्षांवरील नव्याने आधारकार्ड काढणार्याचं आता प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन होणार!)
आधार हा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे भारतातील रहिवाशांना जारी केलेला 12-अंकी अद्वितीय ओळख क्रमांक आहे. हे बायोमेट्रिक आणि लोकसंख्याशास्त्रीय डेटावर आधारित आहे, जसे की बोटांचे ठसे, बुबुळ स्कॅन आणि वैयक्तिक माहिती यांसह हा क्रमांक दिला जातो. ज्यामुळे नागरिकांची ओळख निश्चित होते आणि ती डिजिटल स्वरुपात असल्याने देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात अधिकृत यंत्रणांना उपलब्ध होऊ शकते.