Aadhaar Card Updates: UIDAI ने लॉन्च केला टोल फ्री नंबर; AI Chat Support वर मिळवा आधार स्टेटसचे अपडेट्स
यावर युजर्स त्यांच्या समस्या सांगू शकतात, पीव्हीसी कार्ड स्टेटस तपासून अन्य मदत मागू शकतात.
आधार कार्ड (Aadhaar Card) ची रेग्यलेटर बॉडी Unique Identification Authority of India कडून आयवीआर (IVR) टेक्नॉलॉजीवर आधारित कस्टमर सर्व्हिस सुरू केली आहे. ही सेवा 24 तास सुरू असणार आहे. यासाठी 1947 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागणार आहे. या सेवेच्या माध्यमातून पीवीसी कार्डचं स्टेटस पाहता येतं, आधार अपडेट्स पाहता येतात किंवा एसएमएस द्वारा माहिती देखील मिळवता येते.
UIDAI कडून ही IVRS सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती ट्वीट करून देण्यात आली आहे. ही सेवा 24x7 सुरू राहणार आहे. नक्की वाचा: How To Update Aadhar Card After 10 Years: आता दर 10 वर्षांनी अपडेट करावे लागेल आधार कार्ड; जाणून घ्या आधार अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया .
पहा ट्वीट
UIDAI कडून नवी AI/ML वर आधारित चॅट सपोर्ट देखील सुरू करण्यात आला आहे. यावर युजर्स त्यांच्या समस्या सांगू शकतात, पीव्हीसी कार्ड स्टेटस तपासून अन्य मदत मागू शकतात. help@uidai.gov.in वर तुमच्या समस्या पाठवूनही मदत मागितली जाऊ शकते.