Aadhaar Card Update: आधार कार्ड बाबत UIDAI ने वेबसाईट वरून बंद केल्या 'या' दोन सुविधा; इथे पहा अधिक माहिती
आता तुम्हांला आधारकार्ड वर पत्ता अपडेट करायचा असेल तर तुमच्या रहिवासी पत्त्याचा पर्यायी पुरावा सादर करावा लागणार आहे.
भारतामध्ये आधारकार्ड (Aadhaar Card) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आणि सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक आहे. 12 अंकी आधार नंबरच्या माध्यमातून सारी माहिती लिंक केली जाते. त्यामुळे आधार कार्ड वेळच्या वेळी अपडेट ठेवणं गरजेचे आहे. अगदी प्रवासादरम्यान ते रेशनकार्ड पर्यंत, बॅंक व्यवहारांसाठी आधार कार्ड आणि आधार नंबर महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याच्याशी निगडीत काही महत्त्वाच्या बाबींमध्ये बदल करायचे झाल्यास आता नागरिकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविध केंद्र देण्यात आली आहेत. नक्की वाचा: Aadhaar Card Update: आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदलणे आणखी सोपे झाले, पोस्टमन घरी येऊन करणार अपडेट.
ऑनलाईन आधार कार्ड अपडेट करण्याकडे अनेकांचा कल आहे. यामुळे वेळेची बचत होते. पण नुकत्याच UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सध्या अनिश्चितकाळासाठी वेबसाईट वरून दोन सुविधा बंद केल्या आहेत. यामध्ये आधारकार्ड रिप्रिंट आणि Address proof validation letter या दोन पर्यायांचा समवेश आहे.नक्की वाचा:Aadhaar Card Address Change Update: आधार कार्ड वर पत्ता अपडेट करण्याची पद्धत बदलली; जाणून घ्या नवी प्रक्रिया.
आता आधारकार्ड रिप्रिंट मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे म्हणजे नागरिकांना पूर्वीप्रमाणे लांबलचक आधार कार्ड मिळणार नाही. त्याऐवजी नागरिकांना पीव्हीसी कार्ड दिले जाणार आहे. हे कार्ड एटीएम कार्ड प्रमाणे असल्याने ते सहज इतर कार्ड सोबत ठेवता येईल. आधारकार्डाप्रमाणेच सारे अपडेट्स या नव्या पीवीसी कार्ड वर देखील असेल.
आधार रिप्रिंट प्रमाणे अॅड्रेस वॅलिडेशन लेटर देखील बंद झाले आहे. आता तुम्हांला आधारकार्ड वर पत्ता अपडेट करायचा असेल तर तुमच्या रहिवासी पत्त्याचा पर्यायी पुरावा सादर करावा लागणार आहे.