Aadhaar Card Details Verification: आधार कार्ड चे तपशील तपासण्यासाठी आता QR Code Scan चा पर्याय

तुमच्या आधार कार्डावरील क्यू आर कोड स्कॅन करता येऊ शकतं. यामध्ये तुमचे बायोग्राफ डीटेल्स दिसतील. त्यामध्ये नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि फोटो पाहता येऊ शकतो. डिजिटल साईन देखील पाहू शकाल.

Aadhaar Card प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

भारतीयांना Unique Identification Authority of India कडून आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्त्वाचं ओळखपत्रं जारी केलं आहे. 12 आकडी आधार कार्ड नंबर प्रत्येकाची माहिती स्टोअर केलेली आहे. यामध्ये ओळख आणि रहिवासी ओळखपत्र म्हणून पाहिलं जातं. आता 10 वर्षांपूर्वी ज्यांनी आधार कार्ड बनवलं आहे त्यांनी डिटेल्स अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. तुमचं आधारकार्ड डिअ‍ॅक्टिव्ह झालेले नाही ना? आधार नंबर व्हॅलिड आहे का? याची देखील माहिती तपासणं आवश्यक आहे.

आधार नंबर ऑनलाईन, ऑफलाईन तपासण्यासाठी अनेक पर्याय आहेत. UIDAI Website वर ते तपासता येऊ शकते. सोबतच टोल फ़्री नंबर 1947 वर देखील ही सोय आहे. पण आता ही प्रक्रिया अजून सुकर करण्यासाठी QR code स्कॅन करण्याचाही पर्याय आहे.

तुमच्या आधार कार्डावरील क्यू आर कोड स्कॅन करता येऊ शकतं. यामध्ये तुमचे बायोग्राफ डीटेल्स दिसतील. त्यामध्ये नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि फोटो पाहता येऊ शकतो. डिजिटल साईन देखील पाहू शकाल.

Aadhaar व्हेरिफाय करण्यासाठी QR code कसा वापराल?

  • गूगल प्ले स्टोअर वरून mAadhaar app डाऊनलोड करा आणि तुमच्या स्मार्टफोन मध्ये इंस्टॉल करा.
  • अ‍ॅप ओपन करून क्यूआर कोड आयकॉन वर टॅब करा.
  • आता फोनचा कॅमेरा क्यूआर कोड वर सेट करा. हा कोड Aadhaar card, e-Aadhaar, किंवा Aadhaar PVC कार्ड वर दिसेल.

(हे देखील नक्की वाचा: Aadhaar Mobile and email ID Updation: UIDAI ने नागरिकांना आधार कार्ड सोबत जोडलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफाय करण्याची दिली परवानगी; पहा कसे कराल अपडेट). 

तुमच्या आधार तपशीलामध्ये काही बदल असल्यास तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अपडेट करू शकता. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे तुम्ही तुमचा पत्ता तपशील ऑनलाइन दुरुस्त करू शकता. तुमचे नाव, जन्मतारीख किंवा बायोमेट्रिक डेटा बदलण्यासाठी तुम्हाला आधार नोंदणी केंद्रावर (Aadhaar Enrolment Centre) Biometric Authentication करून घेऊ शकता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now