Head of Family Update In Aadhaar: कुटुंबप्रमुखाच्या संमतीने Online Update करता येणार आधारवरील पत्ता

युआयडीए म्हणते की, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही रहिवासी या उद्देशासाठी कुटुंबप्रमुख असू शकतो

Aadhaar | (Photo credit: archived, edited, representative image)

आधारवरील पत्ता अद्ययावत करायचा असेल तर आता किचकट प्रणालीला समारे जावे लागणार नाही. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ( Unique Identification Authority of India) अर्थातच यूआयडीएआय (UIDAI) ने आता नवी सेवा उपलब्ध करुन दिली आहे. पण ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबप्रमुखाची संमती आवश्यक असणार आहे. होय, कुटुंब प्रमुखाच्या (Head of Family) संमतीने आधारमध्ये पत्ता ऑनलाइन अपडेट करता येणार आहे.

कशी असेल प्रक्रिया

दरम्यान, UIDAI ने दिलेल्या निवेदनानुसार, यूआयडीएआयने विहित केलेल्या पत्त्याच्या दस्तऐवजाचा कोणताही वैध पुरावा वापरून पत्ता अपडेट करण्याचा नवीन पर्याय वापरता येऊ शकतो. युआयडीए म्हणते की, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही रहिवासी या उद्देशासाठी कुटुंबप्रमुख असू शकतो आणि या प्रक्रियेद्वारे त्याचा पत्ता त्याच्या नातेवाईकासोबत सामायिक (शेअर) करू शकतो.

कुटुंबप्रमुखांच्या संमतीने आधारमधील अॅड्रेस ऑनलाइन अॅड्रेस अपडेटमुळे रहिवाशांना जसे की मुले, पती/पत्नी, पालक इत्यादींना मोठी मदत होईल. प्रामुख्याने ज्यांच्याकडे आधारवरील पत्ता अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत असा लोकांना याचा अधिक फायदा होणार आहे. व्यवसाय, नोकरी, विवाह, भौगोलिक स्थान यांसह इतरही विविध कारणामुंळे लोक देशात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात. त्याुळे अशा लोकांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.