7th Pay Commission News : सातव्या वेतन आयोगामुळे लाखो शिक्षकांना मिळणार बंपर सरप्राईझ; प्रति महिना विशेष भत्त्यात होणार वाढ

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकार सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत, लाखो शिक्षकांना एक मोठी वेतनवाढ देणार असल्याच्या चर्चा आहेत.

7th Pay Commission (Photo Credits:

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यंदाचे वर्ष एका मागोमाग एक आनंदाच्या बातम्या घेऊन येणारे ठरले आहे. आता वर्षाअखेरीस सुद्धा, देशातील केंद्रीय विद्यालयातील शिक्षकांसाठी एक बंपर सरप्राईझ मिळणार असल्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्या नेतृत्वाखालील सरकार सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत, लाखो शिक्षकांना एक मोठी वेतनवाढ देणार असल्याच्या चर्चा आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय विद्यापीठ आणि कॉलेज मध्ये समतुल्य शैक्षणिक संवर्ग , कुलसचिव,वित्त अधिकारी, परीक्षा अधिकारी या पदावर कार्यरत असणाऱ्या तब्बल 35,500 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा लाभ होऊ शकतो. यामध्ये सरकार अनुदानित विद्यापीठांचा देखील समावेश असणार आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कुलपती, कुलगुरू, पदव्युत्तर व पदवी महाविद्यालय प्राचार्य यांना अनुक्रमे, 11,250 रुपये, 9,000 रुपये, 6,750 रुपये और 4,500 रुपये इतका विशेष भत्ता देण्यात आला होता. केंद्रीय विश्वविद्यालयातील 30,000 तर मान्यताप्राप्त विद्यापीठातील 5,500 शिक्षकांना याचा लाभ झाला होता. वाढत्या महागाईच्या मध्यात 1 जानेवारी 2016 पासून मोदी सरकारकडून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाल्याने अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा लाभ झाला होता.  7th Pay Commission News: सातव्या वेतन आयोगामुळे भारतीय रेल्वेतील Non- Gazetted Medical कर्मचाऱ्यांना होऊ शकतो 21,000 पर्यंतचा मोठा फायदा; पहा कसा?

दरम्यान, गेल्या महिन्यातच केंद्र सरकारने कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच डीए मध्ये 5 टक्क्यांनी वाढ केली होती. याशिवाय केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा परिवहन भत्ता म्हणजेच टीए सुद्धा वाढवला होता. याशिवाय केंद्रीय कर्मचारी फिटमेंट फॅक्टरमध्ये सुद्धा वाढ मागत आहेत.केंद्र सरकार सर्व कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत फायदा देण्यासाठी प्रयत्नशील असून नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी सरकार त्याची घोषणा होऊ शकते.