7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीत मिळू शकतात 'हे' 3 मोठे गिफ्ट्स
दिवाळी 2021 पूर्वी कर्मचाऱ्यांना तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून बोनस मिळू शकतो.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) दिवाळीत सरकारकडून 3 गिफ्ट्स मिळू शकतात. दिवाळी 2021 पूर्वी कर्मचाऱ्यांना तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून बोनस मिळू शकतो. पहिली भेट म्हणजे कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ मिळू शकते. दुसरी भेट अशी आहे की कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट 2021 साठी डीए थकबाकी (DA Arrears) मिळू शकते. तिसरी भेट म्हणजे 2021 च्या दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ (PF) खात्यावर व्याज मिळू शकतं आणि हे व्याजाचे पैसे पीएफ खातेधारकांच्या बँक खात्यात लवकरच हस्तांतरित केले जाऊ शकतात. (7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मासिक वेतनामध्ये 6,750 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता)
DA मध्ये वाढ:
केंद्र सरकार सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत महागाई भत्ता (डीए) 3 टक्क्यांनी वाढवू शकते. 3 टक्के वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 31 टक्के डीए म्हणून मिळतील. सध्या सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 28 टक्के महागाई भत्ता म्हणून मिळतो. अहवालांनुसार, सरकार दिवाळी 2021 च्या आसपास डीए मध्ये वाढ करु शकते.
DA एरियर:
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 18 महिने थकलेला महागाई भत्ता(Dearness Allowance Arrear)आता मिळू शकतो. हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पीएम मोदी यावर लवकरच निर्णय घेऊ शकतात. असे झाल्यास सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल. दिवाळीच्या दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए थकबाकी मिळेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, कोविड -19 संकटामुळे अर्थ मंत्रालयाने मे 2020 मध्ये डीए वाढ 30 जून 2021 पर्यंत थांबवली होती.
PF चे व्याज देखील मिळेल:
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) 6 कोटीहून अधिक खातेदारांना दिवाळीत एक चांगली बातमी मिळू शकते. पीएफ खातेधारकांच्या बँक खात्यात व्याजाचे पैसे लवकरच हस्तांतरित केले जाऊ शकतात. EPFO लवकरच 2020-21 साठी त्याच्या ग्राहकांच्या खात्यावर व्याज ट्रान्सफर करण्याची घोषणा करू शकते.
सरकारच्या या तीन मोठ्या गिफ्ट्समुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी नक्कीच खास होईल.