Pulwama Terror Attack: दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेले CRPF जवान म्हणजे नेमके कोण? सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय असते त्यांची जबाबदारी?
सीमेवर लढणार्या तिन्ही दलाच्या सैनिकांप्रमाणेच भारतामध्ये सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी CRPF जवान काम करत असतात.
Pulwama Terrorist Attack: उरीनंतर भारतामध्ये झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणून पुलवामा दहशतवादी हल्ला (Pulwama Terror Attack) पाहिला जात आहे. या हल्ल्यामध्ये कुटूंबीयांना भेटून परतणार्या जवानांच्या बसला लक्ष्य करण्यात आलं. IED च्या मदतीने घडवून आणलेल्या या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे. देशभरात या हल्लामुळे रोष आणि संतापाची लाट आहे. पण CRPF जवान म्हणजे नेमकं कोण? त्यांची सुरक्षा दलामध्ये नेमकी भूमिका काय असते हे तुम्हांला ठाऊक आहे का?
CRPF जवान म्हणजे नेमकं कोण?
Central Reserve Police Force जवान म्हणजे केंद्रीय राखीव पोलिस दल. देशात राज्यांतर्गत पोलिसांसोबत अतिसंवेदनशील भागामध्ये CRPF जवान काम करत असतात. प्रामुख्याने जहालवादी संघटना, नक्षलवाद्यांचा सामना करताना CRPF जवान मदत करतात. CRPF म्हणजे केंद्रीय राखीव पोलिस दलाची स्थापना 27 जुलै 1939 साली करण्यात आली. गेली 79 वर्ष देशामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल काम करत आहेत. Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांमध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश
CRPF जवानांच्या यशस्वी मोहिमा कोणत्या?
भारत स्वतंत्र्य झाल्यानंतर विविध संस्थांनाचं विलीनीकरण करून एकसंध भारत देश घडला. मात्र यादरम्यान अनेक ठिकाणी दंगल पेटली होती. या दंगलींवर नियंत्रण मिळवताना CRPF जवानांनी मदत केली होती.
1962 साली भारत- चीन युद्धामध्ये, 1965,1971 या काळात भारत- पाक युद्धामध्ये भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून सीआरपीएफचे जवानदेखील लढले होते.
खलिस्तानी चळवळी करावाया उलथीन लावणं
2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याचा बिमोड
देशभरात जहालवाद आणि नक्षलवाद कारवाया आटोक्यात आणणं, नक्षलवाद्यांना शरण येण्यास भाग पाडणं
CRPF जवान यांची जबाबदारी काय?
UN Peace Keeping Mission मध्ये सहभागी होण्यापासून देशामध्ये शांतता आणि सुरक्षितता टिकावी म्हणून CRPF जवान काम करत असतात. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेसदेखील हे जवान कमा करतात. सोबत देशातील व्हीआयपींच्या सुरक्षेला सज्ज राहणं यासाठी जवानांची नेमणूक देशभर विविध ठिकाणी केली जाते.
सीमेवर लढणार्या तिन्ही दलाच्या सैनिकांप्रमाणेच भारतामध्ये सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी CRPF जवान काम करत असतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)