Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, 2 दहशतवादी ठार
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील नौशेरा शहरातील लाम भागात शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री झालेल्या घुसखोरीविरोधी कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर येत आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists)झालेल्या घुसखोरीत लष्कराच्या जवानांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारतीय लष्कराच्या() अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील(Jammu and Kashmir) नौशेरा शहरातील लाम भागात शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री झालेल्या घुसखोरीविरोधी कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांना मिळालेल्या गुप्तचर आणि संभाव्य घुसखोरीच्या प्रयत्नांच्या माहितीच्या आधारे भारतीय लष्कराने कारवाई सुरू केली होती. (हेही वाचा: Kulgam Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठे यश; चकमकीत 3 दहशतवादी ठार)
सुरक्षा दलांनी या कारवाईत मोठ्या प्रमाणात युद्धसदृश साहित्यही जप्त केले. भारतीय लष्कराने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'दोन दहशतवादी मारले गेले आहेत. त्याशिवाय, दोन एके-47 आणि एक पिस्तूलसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. शोध मोहीम सुरू आहे.' लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'भारतीय सैन्याने कोलाम, नौशेरा भागात घुसखोरांविरोधात ऑपरेशन सुरू केले.'
नौशेरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चकमकीच्या घटना घडत आहेत. 3 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांच्या एका गटाने शोध मोहिमेदरम्यान लष्करावर गोळीबार केला आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
घुसखोरीचा प्रयत्न फसला
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था
ऑगस्ट महिन्याच शेवटच्या आठवड्यात राजौरी येथे दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक झाली. तेव्हा लाठी भागात संशयित दहशतवादी लपून बसले होते. जुलैमध्ये याच जिल्ह्यातील गुंडा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा चौकीवर हल्ला केल्याने एक जवान जखमी झाला होता. महत्त्वाचं म्हणजे काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी तीन टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घडली. 4 ऑक्टोबरला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.