Indor Shocker: वडीलांकडून पैसे उकळण्यासाठी स्वत:च्याच अपहरणाचा बनाव, पोलिसांनी केला भांडाफोड
धक्कादायक प्रकार इंदोर परिसरात खळबळ उडाली आहे.
Indor Shocker: मध्य प्रदेश येथील इंदूर (Indor) परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी एका तरुणाने आपल्या चार मित्रांच्या मदतीने त्याच्या अपहरणाचा कट रचला. त्याने त्याच्या वडिलांना एक व्हिडिओ देखील पाठवला, ज्यामध्ये काही लोक त्याला बेल्टने मारहाण करताना दिसले, त्याच्या वडिलांना हे पटवून देण्यासाठी की त्याला वेदना होत आहेत आणि म्हणून 50,000 रुपयांची खंडणीची मागणी केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तपासणी सुरु केली.
मात्र, पोलिसांनी हा डाव पाहून तरुण आणि त्याच्या तीन मित्रांना अटक केली, तर त्यांचा एक साथीदार फरार झाला. विजय नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी रवींद्र सिंह गुर्जर यांनी सांगितले की, देवास येथील रहिवासी मुकेश बडोतकर यांनी 28 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती की, त्यांचा मुलगा आयुष, जो महाविद्यालयीन विद्यार्थी आहे, त्याचे रेडिसन स्क्वेअरजवळ काही लोकांनी अपहरण केले आहे.
आयुष देवासहून शहरात कोचिंग क्लासला जाण्यासाठी आला होता. त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, आयुषने दुपारच्या सुमारास आपल्या वडिलांना काही लोक पाठलाग करत असल्याचे सांगून फोन केला होता. त्यानंतर काही लोकांनी आपले अपहरण केल्याची माहिती त्याने वडिलांना दिली. आरोपींपैकी एकाने आयुषचे वडील मुकेश यांच्याशी त्याचा (आयुषचा) मोबाईल फोन वापरून बोलला आणि आयुषला सोडण्यासाठी 50,000 रुपयांची खंडणी मागितली.
पैसे न मिळाल्यास आयुषला जीवे मारण्याची धमकी दिली. आपल्या मुलाचे अपहरण झाल्याचे ऐकून मुकेश घाबरला. त्यांनी शहरात धाव घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीसांनी या घटनेची संपुर्ण तपासणी करून पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले