संयुक्त राष्ट्रात भारताकडून पाकिस्तानला कडक प्रत्त्युत्तर; Right To Reply अंतर्गत इम्रान खान यांच्या भडकाऊ विधानांवर विदिशा मैत्रा यांच्याकडून प्रतिक्रिया
'राईट टू रिप्लाय' (Right to Reply) अंतर्गत इम्रान खान यांच्या भडकाऊ वक्तव्यावर भारताच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा (Vidisha Maitra) यांनी प्रतिक्रिया दिली आहे
संयुक्त राष्ट्रीय संघ (United Nation) पाकिस्तानने (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या प्रत्येक चुकीच्या विधानावर भारताने (India) कडक प्रत्युत्तर दिले आहे. 'राईट टू रिप्लाय' (Right to Reply) अंतर्गत इम्रान खान यांच्या भडकाऊ वक्तव्यावर भारताच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा (Vidisha Maitra) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विदिशा मैत्रा म्हणाल्या की इम्रान खानने यूएन च्या व्यासपीठाचा दुरुपयोग केला आहे. इम्रान खान यांनी काश्मीरबद्दल जे काही सांगितले ते खोटे आहे, असे विदिशा मैत्रांनी सांगितले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. पाकिस्तानचे कठोर वर्णन करताना विदिशा मैत्र म्हणाल्या की, पाकिस्तान हा एकमेव असा देश आहे, ज्यांचे सरकार अल कायदा आणि संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या इतर दहशतवाद्यांना (Terrorist) पेन्शन (Pension) देत आहे.
पाकिस्तानला खडेबोल सुनवत विदिशा मैत्रा म्हणाल्या की, पाकिस्तानने दहशतवादी ओसामा बिन लादेनचा उघडपणे बचाव केला होता. तसेच पाकिस्तानने यूएन च्या व्यासपीठाचा गैरवापर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. आज संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादी म्हणून घोषित केलेले 130 लोक पाकिस्तानात लपलेले आहेत. पाकिस्तानात 25 आतंकवादी संघटना आहेत. हे पाकिस्तान मान्य करेल का? पाकिस्तानने इतिहास विसरु नये आणि त्यांनी 1971 मध्ये आपल्या लोकांचे काय केले हे त्यांना आठवले पाहिजे, असेही विदिशा मैत्रा म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा-भारतीय नौदलाच्या ताफ्यात 28 सप्टेंबरला दाखल होणार दुसरी पाणबुडी 'आयएनएस खंदेरी', 350 मीटर खोल समुद्रात जाऊन शत्रूची माहिती मिळणार
ANI चे ट्वीट-
काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी भारताला युद्धाची खोटी धमकी दिली होती. यावर विदिशा मैत्रा म्हणाल्या की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अण्वस्त्र भारतावर सोडण्याची धमकी दिली होती. याला राजकारणांची वागणूक नव्हे तर, लहान नेत्यांची वागणूक म्हटले जाते. जगाने भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांत येऊन पाहायला हवे. एकिकडे भारत विकासावर जोर देत आहे तर, दुसरीकडे पाकिस्तान दहशतवाद्यांना खाद्य पुरवत आहे.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा देणारे अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तान सीमा लगतच्या लोकांना भारताविरुद्ध भडकवण्याचे काम करत आहे. अनुच्छेद 370 भारताचा अंर्तगत विषय असून पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचे समोर आले आहे.