Chinese Apps Ban in India: चीनवर भारताचा डिजिटल स्ट्राइक; मोदी सरकारने Free Fire सह 54 चिनी अॅप्सवर घातली बंदी, येथे पहा यादी
भारत सरकारने 54 चायनीज अॅप्सवर बंदी घातल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. या यादीमध्ये अशा अनेक अॅप्सचा समावेश आहे जे वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
Chinese Apps Ban in India: भारत सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक सुरू केला आहे. अहवालानुसार, सरकारने भारतात 54 चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. (54 Chinese Apps Banned in India) हे ऐकूण वापरकर्त्यांना धक्का बसेल, कारण या यादीत असे अनेक अॅप्स आहेत जे खूप वापरले जातात. अलीकडेच लोकप्रिय गेम फ्री फायर (Free Fire) Google Play Store आणि App Store वरून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे या अॅपवपही बंदी घालण्यात आली आहे का? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. भारतात बंदी असलेल्या 54 चिनी अॅप्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.(वाचा - Pulwama Terror Attack 3rd Anniversary: पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडून शहीदांच्या धैर्य आणि हौताम्याचं स्मरण करत श्रद्धांजली!)
चिनी अॅप्सवर भारतात बंदी -
भारत सरकार काही काळापासून डिजिटल स्ट्राइक चालवत आहे आणि यादरम्यान अनेक चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचवेळी, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने पुन्हा एकदा चीनी अॅप्सवर बंदी घातली असून यावेळी 54 अॅप्सचा समावेश यादीत करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, हे सर्व आधी बॅन केलेल्या अॅप्सचे क्लोन आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने या अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचेही या अहवालातून समोर आले आहे.
या अॅप्सवर बंदी -
भारत सरकारने 54 चायनीज अॅप्सवर बंदी घातल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. या यादीमध्ये अशा अनेक अॅप्सचा समावेश आहे जे वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि ते सामान्य जीवनात देखील खूप वापरले जातात. मात्र, या अॅप्सची संपूर्ण यादी अद्याप समोर आलेली नाही. परंतु अहवालात असे दिसून आले आहे की, या यादीमध्ये Beauty Camera: Sweet Selfie HD, Beauty Camera, Selfie Camera, Equalizer & Bass Booster, CamCard for SalesForce Ent, Isoland 2: Ashes of Time Lite, Viva Video Editor, Tencent Xriver, Onmyoji Chess, Onmyoji Arena आणि AppLock, Dual Space Lite आदी अॅपचा समावेश आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)