रेल्वेमधील नोकरीसाठी 1 लाख पदे रिक्त, 'या' पद्धतीने प्रवेशासाठी अर्ज करा

कारण आरआरसीने रेल्वेमधील नोकरीसाठी 1 लाख रिक्त पदे भरण्यासाठी नोटीस जाहीर केली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतात रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर अशा लोकांसाठी खुशखबर आहे. कारण आरआरसीने रेल्वेमधील नोकरीसाठी 1 लाख रिक्त पदे भरण्यासाठी नोटीस जाहीर केली आहे. तसेच मंगळवार (12 मार्च) पासून रेल्वेपदाच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटीसमध्ये एक लाख पदांसाठी नोकरी देण्यात येणार आहे. तसेच या पदाच्या अर्जासाठी आज 5 वाजल्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. तर 12 एप्रिल 2019 ही शेवटची तारीख प्रवेश प्रक्रियेची असणार आहे. ज्या लोकांना या पदासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरुन याबद्दल अधिक माहिती मिळवावी.(हेही वाचा-रेल्वे भरती, सरकारी नोकरी: RRB, IRCTC आणि Northern Railway मध्ये तब्बल 1 लाख 30 हजार जागा)

या अर्जासाठी 23 एप्रिल पर्यंत शुल्क भरु शकणार आहेत. तर सप्टेंबर-ऑक्टोंबर 2019 मध्ये परिक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे. या भर्तीमध्ये ट्रॅक मेनटेनन्स ग्रेड 4, हेल्पर असिस्टंट, असिस्टंट पोस्टमॅन या पदासाठी अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी जनरल वर्गासाठी 500 रुपये आणि आरक्षित वर्गासाठी 250 रुपये शुल्क अर्जासाठी भरायचे आहेत.

तर परिक्षेसाठी जनरल प्रश्न, गणित, जनरल नॉलेज, रिजनिंग यासारखे प्रश्न विचारले जाणार आहेत. तर परिक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना 90 मिनिटांत 100 प्रश्नांची उत्तरे द्यायची असून निगेटिव्ह मार्किंग पद्धत असणार आहे. या रेल्वेभरतीच्या पदासाठी पुरुषांसाठी 35 किलो वजनासह त्यांना धावण्याच्या स्पर्धेत सहभागी व्हावे लागणार आहे. तर महिलांसाठी 20 किलोवजनासह धावावे लागणार आहे.