Independence Day 2023: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या दिल्या शुभेच्छा, लोकशाही मजबुत करण्याता दिला संदेश
स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी देशभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
Independence Day 2023: देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिना (Independence Day) निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोशल मीडियावरुन सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची लोकशाही मजबूत करुया असं आवाहन केले आहे. देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 व्यांदा लाल किल्ल्यावर भाषण केलं आहे. देशभरात आज स्वातंत्र्य दिना निमित्त आंनदाचे वातावरण पसरले आहे. अजित पवारांनी शुभेच्छा देत, देशाची एकता आणि अखंडता, सार्वभौमता मजबूत करण्याचा स्वातंत्र्यदिनी दृढनिर्धार करुया अशी आशा व्यक्त केली आहे.
देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी केलेल्या त्याग, बलिदानातून मिळालं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखण्यासाठी गेल्या76 वर्षांत भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी बलिदान दिले. या सर्वांच्या त्यागाचं स्मरण करुन देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी कटीबद्ध होण्याचा आज दिवस आहे.
देशाच्या स्वातंत्र्योत्तर ७६ वर्षांच्या वाटचालीत देशाचा गौरव वाढवण्यात शेतकरी, कष्टकरी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, व्यापारी, उद्योजक, संशोधक, खेळाडू, कलावंत मंडळी, विद्यार्थी, शिक्षक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्ते अशा सर्वांचं योगदान आहे. या समस्त देशवासियांची एकजूट, कष्टामुळं, मेहनतीमुळं देश आज अभिमानानं उभा आहे. प्रगती करत आहे. ही एकजूट अशीच कायम ठेवून सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांनी एकत्र येऊन देशाला जागतिक शक्ती बनवण्याचा दृढ निर्धार करुया. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाची लोकशाही मजबूत करुया.
(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 2023 09:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

