Tamilnadu Murder Case: पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर पतीने जिवंत जाळले, नंतर नर्सिंगच्या विद्यार्थिनीसोबत गेला पळून
जिथे एका व्यक्तीने निर्दयीपणे त्याच्या पत्नीला झोपेच्या गोळ्या खायला देऊन ठार (murder) मारले. त्यानंतर पोरूर (Porur) येथील नर्सिंग (Nursing) विद्यार्थ्यीनीसोबत पळून गेला.
तामिळनाडूतून (Tamilnadu) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिथे एका व्यक्तीने निर्दयीपणे त्याच्या पत्नीला झोपेच्या गोळ्या खायला देऊन ठार (murder) मारले. त्यानंतर पोरूर (Porur) येथील नर्सिंग (Nursing) विद्यार्थ्यीनी सोबत पळून गेला. टीओआयने दिलेल्या अहवालानुसार आरोपीची ओळख 30 वर्षीय सत्यमूर्ती अशी आहे. जो तिरुपथूरमध्ये (Tirupathur) कार ड्रायव्हिंग स्कूल चालवतो. अहवालात म्हटले आहे की, 25 सप्टेंबर रोजी त्याने आपली 25 वर्षीय पत्नी दिव्याला रात्रीच्या जेवणानंतर झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तिला जाळून ठार मारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर ती व्यक्ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन घरातून पळून गेला. नर्सिंगची विद्यार्थी त्याची पत्नी दिव्याचा जवळचा नातेवाईक आहे.
घर धूराने वेढलेले पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर ही घटना उघडकीस आली. महिलेचा मृतदेह पाहण्यासाठीच त्यांनी घराकडे धाव घेतली. अहवालात असे म्हटले आहे की त्या व्यक्तीने एक व्हिडिओ शूट केला. तसेच तो अपलोड केला. असे म्हटले आहे की त्याच्या दोन्ही मूत्रपिंड चांगले काम करत नाहीत. कारण तो जास्त काळ जगणार नाही. त्याने आपल्या पत्नीला खूश करणार नाही, म्हणून तिला मारण्याचा निर्णय घेतला. पोलिसांना संशय आहे की या व्यक्तीने विद्यार्थ्यीनी बरोबर पळून जाण्यासाठी पत्नीची हत्या केली. हेही वाचा Haryana Suicide Case: हरियाणामध्ये एका व्यक्तीने कुटूंबातील 4 सदस्यांची केली हत्या, नंंतर स्वत:चेही संपवले आयुष्य
त्या व्यक्तीने आपल्या मुलासह आपले जीवन संपवणार असल्याचे सांगून व्हिडिओ संपवला. तसेच नातेवाईकांना त्याला शोधू नका असे सांगितले. दरम्यान तिरुपथूर येथील एका नर्सिंग विद्यार्थ्यीनीच्या वडिलांना माहिती मिळाली की ती गेल्या दोन दिवसांपासून आपल्या वर्गात अनुपस्थित होती. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोरूर येथील विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. तर नर्सिंग विद्यार्थ्यीनीसोबत सत्यमूर्तीला पाहिले गेले. त्यांंचे मोबाईलही बंद लागत आहे. त्यांना शोधण्याचे काम पोलिस करत आहे.