Rajasthan Crime: राजस्थानमध्ये प्रियकरावरुन पती रोज भांडायचा, पत्नीने गळा आवळून केली हत्या

गुन्हा केल्यानंतर महिलेने पतीच्या आत्महत्येची खोटी कहाणी रचली. या प्रकरणी पोलिसांनी आता पत्नी सरोज आणि प्रियकर सुरेंद्रला अटक केली असून, दोघांचाही न्यायालयातून रिमांड घेतला आहे.

Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

राजस्थानच्या (Rajasthan) चुरू (Churu) जिल्ह्यातील प्रसिद्ध रणजितसिंग ढोली हत्या प्रकरणाचा (Ranjit Singh Dholi murder case) रतनगड पोलिसांनी (Ratangad Police) अखेर पर्दाफाश केला. कोणत्याही क्राइम थ्रिलर चित्रपटाप्रमाणे पत्नी आणि प्रेमी यांनी मिळून नवऱ्याला जीवे मारले. या प्रकरणानुसार, पत्नी सरोजने प्रियकरासोबत आपल्या पतीचा स्कार्फने गळा आवळून खून करण्याचा कट रचला.  गुन्हा केल्यानंतर महिलेने पतीच्या आत्महत्येची खोटी कहाणी रचली. या प्रकरणी पोलिसांनी आता पत्नी सरोज आणि प्रियकर सुरेंद्रला अटक केली असून, दोघांचाही न्यायालयातून रिमांड घेतला आहे. बिरमासर गावात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकरणाबाबत महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती रणजीत अनेकदा तिच्याशी भांडत असे. त्यानंतर 27 डिसेंबर रोजी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

त्यानंतर तिचा प्रियकर सुरेंद्र जाट याला घरी बोलावले आणि दोघांनी मिळून तिचा पती रणजित याचा गळा दाबून खून केला. दिली. त्याचवेळी हत्येनंतर सुरेंद्र फरार झाल्याने पत्नीने पतीच्या आत्महत्येचे नाटक केले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बिरमासर गावातील रहिवासी भंवर सिंह ढोली यांनी मंगळवारी रतनगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ज्यामध्ये त्यांच्या मेहुण्यानेच भावाची हत्या केल्याचे सांगण्यात आले होते. हेही वाचा दिलासादायक! '2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी Covaxin सुरक्षित'- Bharat Biotech चा दावा

त्याचबरोबर पती-पत्नीमध्ये गेल्या एक वर्षापासून भांडण सुरू होते, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मंगळवारी संध्याकाळी मृताच्या भावाच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पुराव्यासाठी एफएसएल टीमला पाचारण केले. त्यानंतर हे प्रकरण आत्महत्येचे नसून हत्येचे असल्याचे समोर आले. दुसरीकडे, या प्रकरणाची माहिती मिळताच एसपी नारायण तोगस, एएसपी सुजानगड जगदीश बोहरा, सीओ रतनगड हिमांशू शर्मा आणि रतनगडचे पोलीस अधिकारी संजय पुनिया घटनास्थळी पोहोचले.