Crime: राजस्थानमध्ये 17 वर्षीय प्रेयसीवर गोळी झाडून प्रियकराची आत्महत्या, तरुणीची स्थिती गंभीर

राजस्थानच्या (Rajasthan) दौसा (Dausa) जिल्ह्यात एका 25 वर्षीय तरुणाने ज्या मुलीशी त्याचे नातेसंबंध होते तिच्यावर गोळी झाडून तिला जखमी केल्यानंतर त्याने आपले जीवन संपवले, असे पोलिसांनी सांगितले.

Gun | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

राजस्थानच्या (Rajasthan) दौसा (Dausa) जिल्ह्यात एका 25 वर्षीय तरुणाने ज्या मुलीशी त्याचे नातेसंबंध होते तिच्यावर गोळी झाडून तिला जखमी केल्यानंतर त्याने आपले जीवन संपवले, असे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या मुलीचे वय सुमारे 17 आहे, तिला जयपूरमधील सवाई मान सिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या महिन्यात दुसऱ्या महिलेशी लग्न करणाऱ्या या व्यक्तीने शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मुलीला शेतात बोलावले. ती आल्यावर त्याने तिच्यावर गोळीबार केला आणि तेथून निघून गेला, असे पोलिसांनी सांगितले. त्या व्यक्तीने घरी पोहोचून मुलीच्या कुटुंबातील सदस्याला फोन केला की ती मृत झाली असून तिचा मृतदेह शेतात पडून आहे.

त्यानंतर त्याने घराच्या छतावर जाऊन स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली, असे त्यांनी सांगितले. दोघांची घरे एकाच गावात 500 मीटर अंतरावर आहेत, असेही त्यांनी सांगितले. फोन येताच मुलीच्या कुटुंबीयांनी शेतात धाव घेतली असता त्यांना ती जखमी अवस्थेत आढळली. त्यांनी तिला दवाखान्याऐवजी घरी नेले. तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. परंतु कुटुंबीयांनी या घटनेची माहिती कोणालाही दिली नाही आणि तिला काही तास घरी ठेवले. हेही वाचा Murder: मोबाईल फोडल्याने रागाच्या भरात प्रेयसीच्या भावाची हत्या, प्रियकर अटकेत

तिची प्रकृती खालावल्यानंतरच त्यांनी तिला रुग्णालयात नेले, असे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या प्रेमप्रकरणाची माहिती स्थानिकांना मिळाल्यास आपली प्रतिष्ठा धोक्यात येईल, अशी भीती त्यांना वाटत असावी. मात्र, तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांनी तिला स्थानिक रुग्णालयात नेले. तेथून तिला जयपूरला रेफर करण्यात आले, महुवा पोलिस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक घनश्याम यांनी सांगितले.

या व्यक्तीलाही त्याच्या कुटुंबीयांनी स्थानिक रुग्णालयात नेले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्या व्यक्तीच्या पोस्टमॉर्टमनंतरच मुलीच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले, असे पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले. प्राथमिक तपासात पुरुष आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्या व्यक्तीने मुलीवर गोळी झाडून आत्महत्या का केली हे स्पष्ट झालेले नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif