Madhya Pradesh Crime: भोपाळमध्ये दुचाकी उचलल्याच्या रागात तरुणाने वाहतुक पोलिसावर केला हल्ला, आरोपीवर गुन्हा केला दाखल
मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) पोलिसांनी एका नो पार्किंग झोनमधून (No parking zone) दुचाकी उचलल्यानंतर एका व्यक्तीने एका वाहतूक पोलिसाला भोसकल्याची घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) पोलिसांनी एका नो पार्किंग झोनमधून (No parking zone) दुचाकी उचलल्यानंतर एका व्यक्तीने एका वाहतूक पोलिसाला भोसकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ज्योती टॉकीजजवळ (Jyoti Talkies) एमपी नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा कार्यालयाबाहेर शनिवारी घडली. हर्ष मीना (Harsh Meena) असे आरोपीचे नाव आहे. तो ज्योती टॉकीजमध्ये आला होता. त्याने आपली दुचाकी नो-पार्किंग झोनमध्ये पार्क केली होती. गुन्हा केल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला ताब्यात घेण्यात आले. तो मुरेनाचा (Munera) रहिवासी आहे आणि सध्या तो कोलारच्या अमरनाथ कॉलनीत राहतो. मीना एक इंजिनिअर आहे. त्याने RGPV मधून इंजिनीअरिंग पूर्ण केले आणि MTech ची तयारी करत होता. जखमी पोलीस अधिकारी श्रीराम दुबे यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
हर्ष मीनाने आपली बाइक नो-पार्किंग झोनमध्ये पार्क केली आणि संगणकाशी संबंधित कामासाठी ज्योती कॉम्प्लेक्स मार्केटमध्ये गेला. दरम्यान वाहतूक पोलिसांच्या क्रेनने त्याची दुचाकी ओढून गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेली. जेव्हा आरोपी बाहेर आला तेव्हा त्याला कळले की त्याची बाईक वाहतूक पोलिसांनी उचलली आहे. त्यानंतर तो पोलीस ठाण्यात गेला.
दुबे यांनी त्याला 600 रुपये दंड आणि वाहन नोंदणीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. आरोपीने नोंदणी कागदपत्रे घेऊन जात नव्हता. कागदपत्रे आणि पैसे आणण्यासाठी तो त्याच्या घरी गेला. परतत असताना त्याने त्याच्यासोबत चाकूही घेतला. पोलिस जात असताना त्याने दुबेच्या पोटात चाकूने वार केले. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आरोपीला पकडले.
दरम्यान दुबे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पोलीस ठाण्यात मनोरुग्णासारखा वागला. तो कोणत्याही कारणाशिवाय हसला आणि नंतर रडू लागला. अशी माहिती दिली आहे. या प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्यावर हत्येचा प्रयत्न आणि अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसपी राजेश भदौरिया यांनी सांगितले की दुबे यांना जेपी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आणि उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.