Assam Murder Case: आसाममध्ये मुलाने मानसिक संतुलन बिघडल्याने जन्मदात्या आईची केली हत्या, गुन्हा दाखल करत पोलिसांनी घातल्या बेड्या
आसामच्या (Assam) कचर (Kachar) जिल्ह्यातील गोसाईपूर (Gosaipur) येथे ही घटना घडली आहे. वडील अपूर्ब कुमार देब यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी अमरजीत देबला (Amarjit Deb) अटक करण्यात आली.
आजारी आईला (Mother) मारहाण केल्याच्या आरोपावरून 35 वर्षीय व्यक्तीला सोमवारी अटक (Arrest) करण्यात आली आहे. आसामच्या (Assam) कचर (Kachar) जिल्ह्यातील गोसाईपूर (Gosaipur) येथे ही घटना घडली आहे. वडील अपूर्ब कुमार देब यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी अमरजीत देबला (Amarjit Deb) अटक करण्यात आली. स्थानिक माध्यमांशी बोलताना अमरजितने कोणताही पश्चाताप दाखवला नाही. तसेच त्याने सांगितले की त्याने आईची हत्या (Murder) केली कारण ती मानसिक स्थितीने अस्थिर होती. अपूर्बांने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अमरजितने त्याच्या आईला 26 सप्टेंबरच्या रात्री बांबूच्या काठीने मारहाण केली होती. माझा मुलगा अमरजीत त्या रात्री रागावून घरी आला आणि आधी त्याच्या आईला ओरडू लागला. त्याची आजारी आई तिच्या पलंगावर झोपली होती.
अमरजित अचानक तिच्या केस उपटले. तसेच तिला मारहाण करायला सुरुवात केली. तो बांबू काठी मारत असताना तीने बचाव करायला सुरुवात केली. तेव्हा अमरजीतचे वडिल अपूर्बींने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने त्यांनीही मारहाण केली. घटनेनंतर स्थानिकांनी अपूर्बला गंभीर जखमी झाल्याने स्थानिक शासकीय आरोग्य केंद्रात नेण्यास मदत केली. मात्र त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. नंतर त्यांनी तक्रार दाखल केली ज्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांनी अमरजीतला अटक केली आणि त्याला 27 सप्टेंबर रोजी स्थानिक न्यायालयात हजर केले. माझी आई मानसिकदृष्ट्या असंतुलित होती. जेव्हा मी त्या दिवशी थकून घरी पोहोचलो तेव्हा तिने विचित्र बोलायला सुरुवात केली. यामुळे मला राग आला आणि मी नियंत्रण गमावले, असे त्याने बाहेर पत्रकारांना न्यायालयाला सांगितले. हेही वाचा Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये किरकोळ वादातून 12 वर्षाच्या मुलाची कापली जीभ, 3 जणांवर गुन्हा दाखल
हे खरे आहे की माझ्या पत्नीला मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या पण हे काही नवीन नव्हते. मी अनेक वर्षांपासून यास सामोरे जात आहे. अमरजीतलाही मानसिक समस्या आहेत आणि आम्ही त्याच्याशी कधीही गैरवर्तन केले नाही. मला माहित नाही की रविवारी रात्री काय झाले त्याने त्याच्या आईची हत्या केली, असे अमरजीतचे वडील म्हणाले.