IITs, IIITs कडून 2020-21 शैक्षणिक वर्षात फी वाढ नाही; केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांचे स्पष्टीकरण
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी शिकवणी फी वाढवणार नाहीत याबाबत मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल "निशंक" यांनी रविवारी जाहीर केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी शिकवणी फी वाढवणार नाहीत याबाबत मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal) यांनी रविवारी जाहीर केले. आयआयटी परिषदेच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि संस्थांचे संचालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) संबंधित निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्र्यांच्या मते आयआयआयटीच्या बाबतीत असे निश्चित करण्यात आले आहे की, जे केंद्रिय-अर्थसहाय्यित आहेत त्यांच्यासाठी पदवीपूर्व कार्यक्रमांच्या शिक्षण शुल्कामध्ये दहा टक्के दराने वाढ करण्यात येणार नाही. (ANM Recruitment 2020: लॉक डाऊनमध्ये Government Job मिळवण्याची संधी; एएनएम साठी 800 हून अधिक पदांवर होत आहे भरती)
“आयआयटी परिषदेच्या स्थायी समितीचे चेअरमन आणि आयआयटीजच्या सर्व संचालकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात आला की, या शैक्षणिक संस्था 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी कुठल्याही कोर्ससाठीची ट्युशन फी वाढवणार नाहीत,” वृत्तसंस्था पीटीआयला पोखरिया यांनी सांगितले. दुसरीकडे, आयआयआयटीजबद्दल म्हणाले की, “ज्या केंद्रीय अनुदानित संस्था आहेत. ज्यांमध्ये अंडरग्रॅज्युएट कोर्सेससाठी नेहमी 10 टक्के शुल्कवाढ केली जाते ती या वर्षी केली जाणार नाही. शिवाय, इतर कोर्ससाठी देखील त्यांनी फी वाढ करु नये अशी विनंती मी त्यांना केली आहे.”
वृत्तानुसार, बीटेकचा एक विद्यार्थी आयआयटी, भारतीय तंत्रज्ञान व अभियांत्रिकी संस्थांमध्ये वार्षिक दोन लाख रुपये भरतो. कोरोना व्हायरसने जगभरात 2.5 मिलियन लोकांना संक्रमित केले आहे. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. आयआयटीने यापूर्वी जाहीर केले होते की कोरोना व्हायरसमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या ऑफर रद्द झाल्या आहेत त्यांच्यासाठी ते विशेष प्लेसमेंट ड्राइव्ह घेतील.