Chhatrapati Sambhaji Nagar Murder: पतीने पत्नीचा गळा दाबून केली हत्या, छत्रपती संभाजीनगर येथील घटना
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पतीने पत्नीची गळा हाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Murder: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पतीने पत्नीची गळा हाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयत झालेल्या महिलेच्या भावाने पोलिस ठाण्यात पती आणि सासू सासरे यांच्या विरोधा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील कापूसवडगाव येथे घडली. भारती संतोष थोरात असं मयत महिलेचे नाव होते. तीला सासरकडे नेहमी मारहाण करायचे आणि माहेरातून पैसे घेऊन ये अश्या कारणावरून भांडण करत असे अशी तक्रार भावाने दिली.
पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, भारती बेसुध्द असल्याची माहिती माहेरच्यांना कळवण्यात आले. भारतीचा भाऊ ज्ञानेश्वर तिला पाहण्यासाठी गेला असताना तेथे त्याला धक्काच लागला. भारतीला शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ज्ञानेश्वर भारतीला बघायला आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.मयत भारतीच्या गळावर व्रण दिसल्यामुळे त्याला भारतीचा खून झाल्याचे संशय आला. गळाच्या अवतीभवती लाल झाल्याचे दिसून आले.यासंदर्भात ज्ञानेश्वरने फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
वैजापूर येथे संतोष दिनकर थोरात (वय 36 वर्ष), दिनकर माणिकराव थोरात (वय 60 वर्ष), रंजना दिनकर थोरात (वय 50 वर्ष) असे आरोपींचे नावं आहे. दिलेल्या तक्रारीनुसार भारतीला सासरची लोक नेहमी त्रास द्यायचे. तिच्याकडून पैसांची मागणी करायचे. माहेरातून पैसे घेऊन ये अशी मागणी करत तिला छळायचे. याचकाराणावरून भारतीची हत्या करण्यात आली असवी अशी तक्रार ज्ञानेश्वरनी पोलिस ठाण्यात दिली आहे.