HMPV in Gujarat: अहमदाबाद शहरातील एका 4 वर्षीय मुलाला मानवी मेटान्यूमोव्हायरसची लागण झाली असून, गुजरातमधील एचएमपीव्ही रुग्णांची एकूण संख्या 8 वर पोहोचली आहे. शहरातील गोटा परिसरातील मुलावर सध्या ट्रस्टच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अहमदाबाद महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी भाविन सोळंकी यांनी दिली. या मुलाला ताप आणि खोकल्यामुळे २८ जानेवारी रोजी एसजीव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दिवशी करण्यात आलेल्या चाचणीत त्याला HMPV ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, असे सोळंकी यांनी सांगितले, तसेच या रुग्णाचा अलीकडच्या काळात विदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नसल्याचे जोडले. “या प्रकरणापूर्वी अहमदाबाद शहरात HMPV चे सहा रुग्ण आढळले होते. यातील तीन रुग्ण इतर ठिकाणचे होते पण त्यांना येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहाही रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले,” असे सोळंकी यांनी सांगितले.
आतापर्यंत गुजरातमध्ये एचएमपीव्हीचे आठ रुग्ण आढळले आहेत, ज्यात अहमदाबादमधील सात आणि साबरकांठा जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 2001 मध्ये सापडलेला एचएमपीव्ही पॅरामिक्सोव्हिरिडी कुटुंबातील आहे. याचा रेस्पिरेटरी सिंसिटिअल व्हायरसशी जवळचा संबंध आहे. यात खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वास लागणे हे लक्षण आहे.
खोकला किंवा शिंकण्यापासून तसेच दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्याने किंवा संक्रमित व्यक्तींच्या थेट संपर्कात येण्यामुळे हा विषाणू श्वसनाद्वारे पसरतो.