Asaduddin Owaisi on Hijab Controversy: 'एक दिवस हिजाबी घालणारी मुलगी पंतप्रधान बनेल', वादानंतर AIMIM खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे ट्विट

ओवेसी म्हणाले होते, भारतीय राज्यघटनेने तुम्हाला चादर, निकाब किंवा हिजाब घालण्याचा अधिकार दिला आहे.

Asaduddin Owaisi l (Photo Credits: Facebook)

Asaduddin Owaisi on Hijab Controversy: कर्नाटकातील एका महाविद्यालयातून हिजाबवरून सुरू झालेल्या वादावर राजकारण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पुन्हा एकदा एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (AIMIM Chief Asaduddin Owaisi) यांनी हिजाब वादावर ट्विट केले आहे. एक व्हिडिओ ट्विट करताना ओवेसींनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'इंशा अल्लाह एक दिवस हिजाबी पंतप्रधान बनेल.'

ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये ओवेसी म्हणत आहेत की, 'आम्ही आमच्या मुलींना शुभेच्छा देतो' इंशाअल्लाह, जर त्यांनी ठरवलं तर अब्बा-अम्मी मी हिजाब घालेन. तर अम्मा-अब्बा म्हणतील - बेटा घाल, आम्ही बघू तुला कोण अडवते. हिजाब तसेच निकाबही कॉलेजात जाईल. कलेक्टरही बनेल, बिझनेस मॅनही बनेल, एसडीएमही बनेल आणि या देशात एक दिवस मुलगी हिजाब घालून पंतप्रधान बनेल. (वाचा - Hijab Controversy: हिजाब विवादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील उच्च शिक्षण विद्यापीठे आणि महाविद्यालये 16 फेब्रुवारीपर्यंत बंद)

भारतीय राज्यघटनेने दिला हिजाब घालण्याचा अधिकार - ओवेसी

यापूर्वी असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाब वादात पुट्टास्वामींच्या निकालाचा संदर्भ दिला होता. ओवेसी म्हणाले होते, 'भारतीय राज्यघटनेने तुम्हाला चादर, निकाब किंवा हिजाब घालण्याचा अधिकार दिला आहे. पुट्टास्वामींचा निकाल तुम्हाला हे करण्याची परवानगी देतो. ही आपली ओळख आहे. ज्या मुलीने त्या मुलांना उत्तर दिले त्या मुलीला मी सलाम करतो. घाबरण्याची गरज नाही. उत्तर प्रदेशमधील एका निवडणूक सभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले होते की, कोणतीही मुस्लिम महिला कोणत्याही भीतीशिवाय हिजाब घालू शकते.

हिजाबचा वाद कुठून सुरू झाला?

देशात हिजाबचा वाद कर्नाटकातील उडुपी येथील विद्यापीठातून सुरू झाला. कॉलेजमध्ये सहा विद्यार्थिनी हिजाब घालून वर्गात आल्या होत्या. यानंतर अशीच प्रकरणे कुंदापूर आणि बिंदूर येथील काही महाविद्यालयांमध्येही आली. राज्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून कॉलेजेस किंवा क्लासेसमध्ये जाऊ दिले जात नाही.

दुसर्‍या गटातील विद्यार्थी भगवे गमछे, स्कार्फ घालून कॉलेजमध्ये येऊ लागल्याने आणि जय श्री रामच्या घोषणा दिल्याने या वादाने राजकीय वातावरण तापले. यानंतर देशभरात निदर्शने झाली. परिस्थिती अशी पोहोचली की कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवावी लागली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif