RBI च्या सत्तत नोटांची व नाण्यांची वैशिष्ट्ये, आकार बदलण्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह; सहा आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश
प्रत्येकवेळी अशी कोणती स्थिती निर्माण होते की तुम्हाला वारंवार नोटांची व नाण्यांची वैशिष्ट्ये आणि आकार बदलावा लागत आहे? असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला आहे.
देशात विविध कारणांनी गेल्या काही वर्षांत अनेक नाणी व नोटा (Notes And Coins) चलनात आलेल्या आहेत. अनेक नाण्यांचे आकार, नोटांचे रंग बदलले आहेत. याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असताना आता उच्च न्यायालयानेही (High Court) याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गुरुवारी हायकोर्टाने याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (Reserve Bank of India) ला विचारणा केली. प्रत्येकवेळी अशी कोणती स्थिती निर्माण होते की तुम्हाला वारंवार नोटांची व नाण्यांची वैशिष्ट्ये आणि आकार बदलावा लागत आहे? असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.
याबाबात उत्तर देण्यासाठी आरबीआयला 6 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लांईंडने एक याचिका कोर्टात दाखल केली होती, त्याबाबत सुनावणी करताना हा मुद्दा उपस्थित झाला. आरबीआय सतत नाणी व नोटा बदलत आहे त्यामुळे अंध लोकांना ती ओळखणे कठीण झाली आहेत. नव्या नोटा व नाणी अंध लोकांना ओळखता येतील, यासाठी लवकरात लवकर नवे मोबाइल अॅप काढण्याचे आदेश आरबीआयला द्यावेत अशी विनंती या संस्थेने केली होती. त्यावर कोर्टाने या प्रश्न उपस्थित केला. (हेही वाचा: RBI कडून 200 आणि 500 च्या नव्या नोटा लवकरच चलनात; पहा काय आहे नव्या नोटांची खासियत)
याबाबत आरबीआयच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना, नोटबंदीमुळे जुन्या नोटा व नाणी बदलावी लागली, असे न्यायालयाला सांगितले. यावर न्यायालयाने नोटबंदी केल्यावर काळा पैसा देशात आला का? असा सवाल केला. आता याबाबत पुढील सुनावणी सहा आठवड्यानंतर होणार आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश प्रदीप नंदराजोग आणि एन.एम. जामदार यांच्या खंडपीठाकडून कालची सुनावणी पार पडली.