Karnataka Rains: मादापूरा गावात मुसळधार पावसाचा कहर, घराची भिंत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू
या घटनेची माहिती गावात पसरताच, गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.
Karnataka Rains: कर्नाटकातील शिवगाव विधानसभा मतदारसंघातील मादापूरा गावात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती गावात पसरताच, गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. देशभरात सर्वत्र मुसळधार पावसाची बॅटींग सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते साचले आहे. हेही वाचा- पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक राष्ट्रीय महामार्ग बंद
हावेरी जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे शिवगाव विधानसभा मतदारसंघातील सावनूर तालुक्यातील मादापूरा गावात घराची भिंत कोसळून दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, माजी मुख्यमंत्री बोम्मई यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेनत आणखी तीन जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्य सरकारने जखमीचा उपचाराचा खर्च करावा अशी विनंती माजी मुख्यमंत्री यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून योग्य भरपाई देण्याची विनंती देखील केली.
दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांनी भूस्खलन आणि खडक कोसळण्याच्या मडिकेरी आणि संताजे दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग २७५ बंद करण्याची घोषणा केली. खबरदाराची उपाय म्हणून १८९ जुलै ते २२ जुलै दररोज रात्री 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजे पर्यंत निर्बंध लागू असतील. या तासांमध्ये आपतकालीन सेवेचा काम वगळता या मार्गावर प्रवास करण्यास मनाई आहे. प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही उपाययोजना केली आहे. प्रवाशांना विनंती आहे की, त्यांना सहाकार्य करावे आणि प्रवास नियोजनपुर्वक करावे.