Weather Update: राज्यासह मध्यप्रदेश, ओडिशा, कर्नाटकमध्ये अतिवृष्टीचा इशारा; छत्तीसगडमध्ये गारपिटीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओडिशा, कर्नाटकमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. तसेच, काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Weather Update: भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार, 16 मे पर्यंत भारताच्या दक्षिण भागात गडगडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा(Rainfall Prediction) दिला आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओडिशा, कर्नाटकमध्ये पावसाच्या (Rainfall)जोरदार सरी कोसळतील. तसेच, काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. त्याशिवाय, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दक्षिण राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये धुळीचे वादळ येण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. (हेही वाचा:Maharashtra Weather Forecast: मतदारांनो काळजी घ्या, राज्यात तुफान पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट )
उत्तर भारतातील अनेक भागांवर परिणाम
वेस्टर्न डिस्टर्बन्सचा अनेक भागांवर परिणाम होणार आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस बरसण्याची शक्यता आहे. 13आणि14 मे रोजी म्हणजेच आज आणि उद्या हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर, मुझफ्फराबाद, उत्तराखंड, गिलगिट आणि बाल्टिस्तान येथे हलक्या पावसाच्या सरी कोसळतील.
दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, चंदीगड आणि राजस्थानमध्ये विजांचा कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची उच्च शक्यता आहे. ही परिस्थीती 16 मे पर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये धुळीचे वादळ
दरम्यान, पुढील दोन दिवस दक्षिण राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वारे वाहतील असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाविषयी देखील सूचित करण्यात आले आहे.