HDFC Bank Employee Dies by Cardiac Arrest: एचडीएफसी बँकेचा अनुभवी कर्मचारी(HDFC Bank Employee) सफी खान, 19 नोव्हेंबर 2024 रोजी क्लायंट मीटिंगची तयारी करत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) मृत्युमुखी पडला असा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. त्याच्या पत्नीचा असा दावा आहे की बँकेतील कामाचा ताण आणि कामाची संस्कृतीही त्याच्या मृत्यूचे मोठे कारण आहे. 22 वर्षांचा अनुभव असलेल्या खान याला कोणताही आजार नव्हता, असेही पत्नीने सांगितले आहे. (Viral Video: मित्राच्या लग्नात तरुणाला स्टेजवर हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू, कुरनूल जिल्ह्यातील व्हिडिओ व्हायरल)
सफी याच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, मृत्यूपूर्वी ते रजा मागण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्यावर कामाचा दबाव देण्यात आला. त्यामुळे छळ सहन करावा लागला होता. ही दुःखद घटना एका धटनेचे अनुसरण करते, ज्यामध्ये सदाफ फातिमा आणि शिवम मेहरोत्रा या इतर दोन कर्मचाऱ्यांचा बँकेत अशाच परिस्थितीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. सफी खानच्या पत्नीने एचडीएफसी बँक, आरबीआय आणि इतर अधिकाऱ्यांकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे, तिच्या पतीला न्याय मिळावा आणि कामाच्या ठिकाणी वातावरणात बदल करण्याची मागणी तिने केली आहे.