Haryana Roadways Bus Accident: हरियाणाच्या पंचकुला येथे भीषण अपघात, रोडवेज बस उलटल्याने 40 शाळकरी मुले जखमी - VIDEO

येथे भरधाव वेगात जाणारी रोडवेज बस पलटी झाल्याने सुमारे ४० शालेय विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना पिंजोर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बस चालक फरार झाला, तर कंडक्टरही अपघातात जखमी झाला.

Haryana Roadways Bus Accident

Haryana Roadways Bus Accident: हरियाणातील पंचकुला येथील पिंजोर येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे भरधाव वेगात जाणारी रोडवेज बस पलटी झाल्याने सुमारे ४० शालेय विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना पिंजोर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बस चालक फरार झाला, तर कंडक्टरही अपघातात जखमी झाला. त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत सध्या तपास सुरू आहे. मात्र, चालक बस भरधाव वेगाने चालवत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चालकाचा बसवरचे नियंत्रण सुटले आणि तोल गेला आणि हा अपघात झाला.

पाहा पोस्ट:

#WATCH | Around 40 school students injured after a bus overturns near Pinjore in Haryana; Injured students admitted to govt hospital in Pinjore

Visuals from Govt hospital, Pinjore pic.twitter.com/zI5rEUI2mS

— ANI (@ANI) July 8, 2024

पंचकुलामध्ये बस उलटली

 ग्रामीण भागातील सरकारी शाळांची मुले रोडवेज बसने प्रवास करतात. यामुळेच हे विद्यार्थी आज सकाळी शाळेसाठी बसने प्रवास करत होते. दरम्यान, बसचा वेग जास्त असल्याने एका वळणावर चालकाला बसवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि बस उलटली.

अपघातानंतर चालक आणि वाहक निलंबित

ताज्या माहितीनुसार, अपघातानंतर हरियाणा रोडवेजने याप्रकरणी कारवाई करत बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरला निलंबित केले आहे.