Maid Blinds Women: डोळ्यात हार्पिकचे थेंब आणि झंडू बाम, वृद्धेला अंधत्व; चोरीच्या उद्देशाने मोलकरणीकडून धक्कादायक कृत्य
मोलकरणीने आपला गुन्हा कबूल केला आहे. सध्या पोलिसांनी तिला अटकही केली आहे. हे संपूर्ण प्रकरण गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातील आहे.
हैदराबाद : घरात चोरी करण्यासाठी एका 73 वर्षीय महिलेला एका मोलकरणीने आंधळे केले. मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या भार्गवी नावाच्या या महिलेने तिच्या मालकाला आंधळे करण्यासाठी हार्पिक आणि झंडू बामचे आय ड्रॉप तयार केले. मोलकरणीने आपला गुन्हा कबूल केला आहे. सध्या पोलिसांनी तिला अटकही केली आहे. हे संपूर्ण प्रकरण गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातील आहे. न्यू इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, 73 वर्षीय हेमवती नचाराम श्रीनिधी अपार्टमेंटमध्ये एकट्या राहतात. लंडनमध्ये राहणारा त्यांचा मुलगा शशिधर याने ऑगस्ट 2021 मध्ये भार्गवीला त्याच्या आईच्या देखरेखीखाली ठेवले. भार्गवी तिच्या सात वर्षांच्या मुलीसह हेमवतीच्या फ्लॅटमध्ये राहू लागली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जेव्हा तिने हेमवतीला डोळे चोळताना पाहिले तेव्हा भार्गवी म्हणाली की मी तुमच्या डोळ्यात काही थेंब टाकते ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. तिने शांतपणे बाथरूम क्लीनर हार्पिक आणि झंडू बाम पाण्यात मिसळून त्यांच्या डोळ्यात ओतले.
चार दिवसांनंतर हेमवतीने आपल्या मुलाला डोळ्यात संसर्ग झाल्याचे सांगितले, ज्यावर शशिधरने तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात जाण्यास सांगितले. दरम्यान, भार्गवीने 40 हजार रुपये रोख, दोन सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन आणि इतर काही दागिने चोरून नेले.
रुग्णालयाने काय सांगितले
हेमवतीची तब्येत बिघडल्याने त्यांची मुलगी उषाश्री त्यांना पुन्हा रुग्णालयात घेऊन गेली. पण आराम काय मिळाला नाही. लवकरच, 73 वर्षीय हेमवती महिलेची दृष्टी पूर्णपणे गेली. त्यानंतर शशिधर हैदराबादला आला आणि आईला घेऊन एल.व्ही. प्रसाद नेत्र रूग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी सांगितले की अंधत्वाचे कारण डोळ्यांमध्ये विषारी द्रावण टाकणे आहे. (हे ही वाचा Ludhiana: टेस्ट ड्राइव्हसाठी म्हणून मागितली यामाहा R15, मालकाने चावी देताच बाइक घेऊन झाला पसार)
मोलकरीणला अटक
यानंतर कुटुंबीयांना भार्गवीवर संशय आला. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. चौकशीत भार्गवीने गुन्ह्याची कबुली दिली. बुधवारी तिला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली.
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2022 01:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

