Hardoi Accident: वाळूने भरलेला ट्रक झोपडीवर उलटला, कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशमधील घटना

ट्रक चालक आणि हेल्परला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Representational Image (File Photo)

Hardoi Accident: उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ल्ह्यात मोठी दुर्घटना घडली. मल्लवन-उन्नाव रस्त्यावरील एका झोपडीवर वाळूने भरलेला ट्रक(Sand Truck) उलटल्याने कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू (Death)झाला आहे. मृतांमध्ये दाम्पत्य, त्यांच्या चार मुली, जावई आणि नातवंडांचा समावेश आहे. पोलिसांनी ट्रक चालक आणि हेल्परला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या अपघाताने परिसरात हळाहळा व्यक्त केली जात आहे. चालकाने वाळूने भरलेल्या ट्रकवरचे नियंत्रण गमावल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीवर उलटला. या घटनेत झोपडीत झोपलेल्या चार निष्पाप मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. (हेही वाचा:Madhya Pradesh Accident: रस्ता ओलांडताना भरधाव कारची मुलीला धडक, घटना CCTV कैद (Watch Video))

मृतांमध्ये अवधेश उर्फ ​​बल्ला (45), त्याची पत्नी सुधा (42), मुलगी सुनैना (11) आणि अन्य सदस्यांचा समावेश आहे. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी दाखल होत. ट्रक सरळ करून जेसीबीच्या मदतीने वाळू काढली.

चालक व हेल्पर ताब्यात

या घटनेत अवधेश यांची मुलगी बिट्टू जखमी झाली.तिला उपचारासाठी आरोग्य केंद्र मल्लवण येथे दाखल करण्यात आले आहे. ट्रक चालक बिलग्राम कोतवाली भागातील रहिवासी असून हेल्परलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



संबंधित बातम्या