IPL Auction 2025 Live

Rajasthan: लॉकडाऊनमुळे महिला कॉन्स्टेबलला मिळाली नाही रजा; पोलिस ठाण्यातचं लावली हळद, पहा फोटो

पण कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे तिला हळद सोहळ्यासाठी सुट्टी देण्यात आली नाही. यामुळेचं पोलिस स्टेशनमध्ये हळदीचा विधी पार पडला.

Haldi ceremony of a woman police constable (PC- ANI)

Rajasthan: राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे निर्बंध लागू आहेत. राजस्थानमधील एक महिला पोलिस कॉन्स्टेबल तिच्या हळदी सोहळ्यासाठी चर्चेत आली आहे. डूंगरपूर कोतवाली (Dungarpur Police Station) येथे तैनात आशा नावाच्या महिला पोलिस कॉन्स्टेबलचा हळद सोहळा पोलिस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आला. राज्यात लॉकडाऊनमुळे पोलिस बंदोबस्त असल्याने आशाचा हळद सोहळा समारंभ पोलिस स्टेशनच्या आवारात झाला. तिला लॉकडाऊनमुळे सुट्टी मिळाली नाही.

न्यूज एजन्सी एएनआयनुसार, महिला पोलिस हवालदार आशाचे लग्न होणार आहे. पण कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे तिला हळद सोहळ्यासाठी सुट्टी देण्यात आली नाही. यामुळेचं पोलिस स्टेशनमध्ये हळदीचा विधी पार पडला. येथील पोलिस ठाण्यात इतर महिला हवालदारांनी वधू आशाला हळद लावली आणि मंगल गाणे गाऊन विधी उत्तम प्रकारे पार पाडला. (वाचा - 'दोन कानाखाली खाशील,' ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या व्यक्तीला केंद्रीय मंत्र्यानी दिले उत्तर; पहा व्हायरल व्हिडिओ)

आशाने सांगितले की, गेल्या वर्षी मे मध्ये तिचे लग्न होणार होते. परंतु, देशव्यापी लॉकडाऊन आणि कोरोनामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले. 30 एप्रिल रोजी लग्नसोहळा पार पडणार आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे ती अजूनही कर्तव्यावर आहे. सुट्टी न मिळाल्याने तिला हळदीच्या विधी पोलिस ठाण्यातचं आयोजित करावा लागला.

दरम्यान, आशाच्या हळदी समारंभात पोलिस स्टेशनच्या महिला कर्मचार्‍यांनी कुटुंबाची भूमिका साकारली आणि लग्नाचे गाणे गाऊन तिला हळदी लावली. फोटोमध्ये महिला कर्मचारी आशाला हळद लावताना दिसत आहे. आता आशाला लग्नासाठी सुट्टी मिळाली आहे.