अहमदाबाद: नवऱ्याने तिहेरी तलाक दिल्याने बायकोने केला आत्महत्येचा प्रयत्न

त्यामुळे आता मुस्लिम समाजातील एखाद्या व्यक्तीने बायकोला तिहेरी तलाक दिल्यास 3 वर्षांची शिक्षा दिली जाणार असल्याचे कायद्याअंतर्गत ठरवण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

राज्यसभेत मंगळवारी (30 जुलै) तिहेरी तलाक कायदा (Triple-Talaq Bill) बहुमताने पास करण्यात आला. त्यामुळे आता मुस्लिम समाजातील एखाद्या व्यक्तीने बायकोला तिहेरी तलाक दिल्यास 3 वर्षांची शिक्षा दिली जाणार असल्याचे कायद्याअंतर्गत ठरवण्यात आले आहे. मात्र आजच गुजरात (Gujrat) मधील एका महिलेला नवऱ्याने तिहेरी तलाक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. नवऱ्याच्या या प्रकारामुळे बायकोने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पीडित महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.  या महिलेवर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपाचार सुरु आहेत. सदर महिलेने सासरची मंडळी आणि नवऱ्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.(Triple Talaq Bill: तिहेरी तलाक दिल्यास काय होईल शिक्षा? जाणून घ्या ह्या विधेयका विषयी सविस्तर)

मिळालेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, नवऱ्याने बायकोकडे EMI भरण्यासाठी पैसे मागितले होते. परंतु बायकोने त्यासाठी पैसे देण्यास नकार देत माहेरी निघुन गेली. यामुळे नवऱ्याने  बायकोच्या माहेरी धाव घेत तिला तीन वेळा तलाक  म्हणत निघून गेला. नवऱ्याने तलाक दिल्याने बायकोने घाबरुन स्वत:वर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पीडित महिलेच्या लग्नाला पाच वर्ष झाली असून नवरा अद्याप कोणतेही काम करत नव्हता. यामुळे बायकोच्या घरातील मंडळींनी या दोघांना राहण्यासाठी घर सुद्धा दिले होते. परंतु या घराचे कर्ज नवऱ्याला भरण्यास सांगितले होते. यासाठी नवरा बायकोवर नेहमी दबाब टाकत असल्याचे ही महिलेने पोलिसांना सांगितले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif