Accident And Dog PC Pixabay

Gujarat Accident: गुजरात येथील नर्मदा जिल्ह्यात एका 55 वर्षीय शिक्षकाने कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्यामुळे कारचा अपघात झाला आणि या अपघातात त्याच्या पत्नीने जीव गमावला असल्याची माहिती मिळत आहे. पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याने त्याने पोलिस ठाण्यात स्वत: विरुध्दात एफआयआर दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात एखच खळबळ उडाली आहे.खेरोज-खेडब्रह्मा महामार्गावरील दान महुडी गावाजवळ हा अपघात झाला. (हेही वाचा- मोटारबाईकला अनियंत्रित कारची धडक,एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू; लालबाग येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी 4 फेब्रुवारी दुपारी घडली. अमिता असं अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर परेश दोशी असं पतीचे नाव आहे. तो गुजरातच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करतो. गुजरात मधील बनासकांठा जिल्हातील साबरकांठा महामार्गावरून जात असताना हा अपघात झाला. त्यांच्या गाडीसमोर एक भटका कुत्रा आला त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात परेश यांनी कार वळवली आणि कार अनियंत्रित झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात अमिताने जीव गमावला. धडक इतकी भीषण होती की, कारच्या खिडकीतून बॅरिकेड्स आत घुसले आणि अमिताला यात गंभीर दुखापत झाली.

अपघातस्थळी लोकांनी गर्दी केली. तिला रुग्णालयात दाखल केले आणि पंरतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यानंतर ही गोष्ट परेशला सहन झाली नाही. परेश पोलिस ठाण्यात गेला आणि त्याने पोलिस ठाण्यात स्वत:विरुध्दात गुन्हा दाखल करून घेतला. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार, अपघाताला तो जबाबदार आहे आणि केवळ त्याच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाला असं सांगितलं.