Jammu Kashmir Update: जम्मू -काश्मीरमधील चानापोरा येथे सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला, एक जवान आणि महिला रहिवासी जखमी

या हल्ल्यात एक सीआरपीएफ (CRPF) जवान जखमी झाला आहे. याशिवाय या हल्ल्यात एक महिला जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

File image of security forces in Jammu and Kashmir (Photo Credits: IANS)

जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दहशतवादी (Terrorist) हल्ल्याची बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांनी चानापोरा () येथे सुरक्षा दलांवर (Security forces) ग्रेनेड (Grenade attack) फेकल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्याची ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जाचा जम्मू -काश्मीरवरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील (Srinagar) चानापोरा पोलीस स्टेशनच्या बाहेर सुरक्षा दलाच्या ब्लॉकवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक सीआरपीएफ (CRPF) जवान जखमी झाला आहे. याशिवाय या हल्ल्यात एक महिला जखमी झाल्याचेही वृत्त आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकांनी परिसराला घेराव घातला आहे. हेही वाचा Party Switching in India: गेल्या सात वर्षांत 1133 उमेदवार, 500 खासदार आमदारांनी बदलला आपला पक्ष; सर्वाधिक फटका Congress ला, पहा आकडेवारी

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी चानापोरा येथील सीआरपीएफ बीएन 29 वर ग्रेनेड फेकला. या घटनेत एक सीआरपीएफ जवान आणि एक नागरिक महिला किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेत जितेंद्र कुमार यादव यांना मांडी आणि डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांकडून परिसराला घेरण्यात आले आहे. अतिरिक्त फौज घटनास्थळी पोहोचली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

यापूर्वी अनंतनाग जिल्ह्यातील शेरबाग येथील एका पोलीस चौकीवरही दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला होता.  दुसरीकडे, अलीकडेच पाकिस्तानचा एक मोठा आणि घृणास्पद कट उघडकीस आला आहे. एका गुप्तचर अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान काश्मीरमधील लोकांना अफगाणिस्तानचे व्हिडिओ दाखवून त्यांना भडकवण्याचे षडयंत्र रचत आहे.  एवढेच नव्हे तर पाकिस्तानचे धाडस बघा की तो काश्मीरला इस्लामिक राज्य म्हणत आहे. गुप्तचर अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, पाकिस्तान काश्मीरच्या निवडून आलेल्या पंचायतीच्या प्रतिनिधींना राजीनामा देण्याच्या नापाक आराखड्यांना अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

अहवालानुसार, पाकिस्तानने प्रतिनिधींना पंचायतीचा राजीनामा न दिल्यास भयंकर परिणामांची धमकी दिली आहे. या धमकीच्या भीतीने आतापर्यंत एका सदस्याने राजीनामा दिला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. मंत्रालयाने अशा शक्तींना कडकपणे सामोरे जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.