Greater Noida: खोलीत सापडला पतीचा मृतदेह, पत्नी फरार, पोलिसांकडून तपास सुरु
पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. हा तरुण 5 ते 6 दिवसांपासून या घरात पत्नीसह राहत होता, पोलिस घटनास्थळी पोहोचले असता पत्नी तेथे आढळून आली नाही, तसेच पत्नीचा फोनही बंद असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Greater Noida: ग्रेटर नोएडातील कसना पोलीस स्टेशन परिसरात एका बंद खोलीत पोलिसांना तरुणाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. हा तरुण 5 ते 6 दिवसांपासून या घरात पत्नीसह राहत होता, पोलिस घटनास्थळी पोहोचले असता पत्नी तेथे आढळून आली नाही, तसेच पत्नीचा फोनही बंद असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता या दोघांमध्ये कोणत्यातरी मुद्द्यावरून वाद झाल्याचे समोर आले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. हे देखील वाचा: Bokaro Road Accident: झारखंडमधील बोकारो येथे झालेल्या अपघातात पाच ठार, तीन जखमी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी कासना पोलिस स्टेशन हद्दीतील सिरसा गावात भाड्याच्या घरात एक व्यक्ती मृतावस्थेत असल्याची माहिती मिळाली. कासना पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात बुलंदशहर येथील बानी सिंग असे मृताचे नाव असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घरमालकाकडे चौकशी केली असता, त्याने सांगितले की, बानी सिंह गेल्या ५-६ दिवसांपासून पत्नीसोबत येथे राहत होता.
पोलिसांना बानी सिंगची पत्नी घटनास्थळी सापडली नाही, तिचा शोध सुरू आहे. बानी सिंग यांच्या पत्नीचा मोबाईलही बंद आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता, मृत आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्याचे समोर आले. या सर्व बाबींची कसून चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. ज्यामध्ये त्याची पत्नी येताना किंवा जाताना दिसत होती.