Gopalganj: खळबळजनक! अनैतिक संबंधातून शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचे गुप्तांगच कापले; संबंधित महिलेच्या पतीसह तिघांना अटक

याप्रकरणी आरोपीने अनेकदा मृत व्यक्तीला चेतावणी दिली होती.

crime I mage only representative purpose (Photo credit: pxhere)

अनैतिक संबंधातून एका 55 वर्षीय व्यक्तीचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बिहारमधील (Bihar) गोपालगंज (Gopalganj) येथे घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी संबंधित महिलेच्या पतीसह दोन महिलांना अटक केली आहे. या तिघांनी मिळून या व्यक्तीचे आधी गुप्तांग कापले आहे. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून त्याला ठार केले. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

बैजनाथ चौधरी असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बैजनाथ चौधरी यांना तीन मुले आणि पाच मुली अशी एकूण 8 मुले आहेत. यातील दोन मुली सोडून उर्वरित सर्व मुलांची लग्न झाली आहेत. बैजनाथ यांचे शेजारी राहण्याऱ्या एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याप्रकरणी आरोपी शिव कुमार चौधरीने अनेकदा बैजनाथला याबाबत चेतावणी दिली होती. मात्र, तरीही बैजनाथ हे शनिवारी चौधरी यांच्या घरात घुसले. त्यावेळी शिव कुमार यांनी आपल्या दोन्ही पत्नीच्या मदतीने बैजनाथ यांचे गुप्तांग कापून त्यांची निघृण हत्या केली आहे. हे देखील वाचा- Zirakpur: एक लाख द्या, नाहीतर तुमची पत्नी आणि मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करतो; जीरकपूर येथील एका व्यावसायिकाला धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या दोन बायका आहेत. तसेच त्याच्या दुसऱ्या पत्नीसह मृताचे अनैतिक संबंध होते. यासंदर्भात माहिती होताच आरोपीने मृत व्यक्तीची समजूत घातली. परंतु, तरीही मृत व्यक्ती संबंधित महिलेच्या संपर्कात राहिला. याच रागातून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.