Gonda: फाटकं ओलांडताना रेल्वे रुळावर अडकली कार; थोडक्यात अनर्थ टळला (Watch Video)

ही घटना गोंडा येथे घडली. कार रेल्वे रुळावर अडकल्याने रेल्वेला थांबवावी लागली असे रेल्वे संरक्षण दलाने सांगितले. रेल्वे थांबल्यामुळे मोठा अपघात टळला.

Car Stuck PC X

Gonda: रेल्वे रुळ ओलांडताना एक कार रेल्वे रुळावर अडकल्याची घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा येथे घडली. कार रेल्वे रुळावर अडकल्याने रेल्वेला थांबवावी लागली असे रेल्वे संरक्षण दलाने सांगितले. रेल्वे थांबल्यामुळे मोठा अपघात टळला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा-लग्नाच्या पार्टीतून परतनाऱ्या बसचा भीषण अपघात, दरीत कोसळल्याने ३० जण दगावले)

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ आणि गौंडा रेल्वे सेक्शन वरील कर्नलगंज आणि सरयू रेल्वे स्थानकांदरम्यान कटरा शाहबाजपूर येथील क्रॉसिंग गेट क्रमांक 286 वर ही घटना घडली. आरपीएफने वेळीच रेल्वेला थांबवली त्यामुळे भीषण अपघात टळला. कारमध्ये तीने लोक प्रवास करत होते.

घटनेचा व्हिडिओ 

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरपीएफ आणि स्थानिक रेल्वे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने कारला रेल्वे रुळावरून काढण्यात आले. त्यानंतर रेल्वे  वाहतूक सेवा सुरळीत करण्यात आली. कार प्रवाशी थोडक्यात वाचले. कार चालकाने सांगितले की, त्याला कुटुंबातील सदस्याच्या अंत्यसंस्कारला जाण्यास उशीर होत असल्याने त्यांनी रेल्वे रुळ ओलांडला. परंतु रुळात चाक अडकले गेले. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.