IPL Auction 2025 Live

Indian Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारासाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या काय आहे पात्रता आणि पगार

ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

Representational Image (Photo Credits: PTI)

Indian Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वेने (Indian Railway) ईस्ट कोस्ट रेल्वे (Indian Railway Recruitment 2022) अंतर्गत शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वेमध्ये (Sarkari Naukari) नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rrcbbs.org.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च आहे. (वाचा - SBI Recruitment 2022: एसबीआय मध्ये 48 पदांवर होतेय Assistant Managers पदांवर नोकरभरती; 25 फेब्रुवारी पर्यंत sbi.co.in वर करा अर्ज)

किती पदांसाठी भरती होणार?

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 756 पदे भरण्यात येणार आहेत. अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी उमेदवार https://etrpindia.com/rrc_bbn_act/pdfs/act.pdf. या लिंकला भेट देऊ शकतात. त्याच वेळी, तुम्ही https://etrpindia.com/rrc_bbn_act/pdfs/act.pdf या थेट लिंकद्वारे देखील अर्ज करू शकता. (वाचा - BSF Recruitment 2022: बीएसएफमध्ये बंपर भरती, 800 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या किती असेल पगार)

भारतीय रेल्वे भरती 2022: महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 08 फेब्रुवारी

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 मार्च

पात्रता आणि वयोमर्यादा -

ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर अर्जदाराची कमाल वयोमर्यादा 15-24 वर्षे असावी.