Gold Prices Today: सोने 1800 रुपयांनी महागले; कारण घ्या जाणून
दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 450 रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीचा दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आज चांदीचा दर 500 ते 1000 रुपयांनी वाढला आहे.
Gold Price Hike: सोन्याच्या भावात रविवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पहायला मिळाले. दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 450 रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीचा दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आज चांदीचा दर 500 ते 1000 रुपयांनी वाढला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात 450 रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचा दर 42,790 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरात 500 ते 1 हजार रुपयांनी वाढ होत 48,600 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. या भाववाढीला जागतिक बाजारातील परिस्थिती कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोन्याची ही दरवाढ अनेकांना अचंबित करणारी आहे. पण त्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत.
दिवसांदिवस सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने सोन्याची खरेदी करणाऱ्या लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच सोन्याची खरेदी करायची की नाही, असाही प्रश्न अनेकांच्या समोर उभा राहिला आहे. याशिवाय सोन्याच्या झपाटीने वाढणाऱ्या भावाचे नेमके कारण काय? असाही विचार अनेकांच्या मनात फिरू लागला आहे. महत्वाचे म्हणजे, चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचाही फटका दिल्ली सराफा बाजाराला बसल्याचे दिसत आहेत तर, जाणू घ्या सोन्याच्या वाढत्या भावाचे तर, जाणून घेऊया सोन्याच्या वाढत्या भावाचे दोन प्रमुख कारण-
या वर्षी जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याच्या भावामध्ये 7 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे जागतिक विकासावर परिणाम होण्याची भिती गुंतवणूकदाराच्या मनात आहे. आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. त्यामुळे सोने खरेदी मोठया प्रमाणात वाढली आहे. कोरोना व्हायरसचा चीनच्या विकासावर परिणाम झाला असून, अन्य देशांच्या आर्थिक प्रगतीवरही मर्यादा येऊ शकतात असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने दिला आहे. याशिवाय, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. चीनच्या बाहेर कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरक्षित गुंतवणूकीला गुंतवणूकदारांचे पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे अमेरिकन डॉलरची मागणी वाढली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात होणाऱ्या सोन्याची किंमत वाढली आहे. जीएसटीमुळेही या दरामध्ये आणखी वाढ होत आहे. हे देखील वाचा- Gold Rate Today: सोनं महागलं, सराफा बाजारातील आजचे दर 41 हजारांच्या पार
सोन्याचा भाव येत्या काही दिवसांत पन्नास हजारांवर जाण्याची शक्यता सराफांकडून वर्तविली जात आहे. नागरिकांनी शुक्रवारी 43 हजार 800 भावाने सोन्याची खरेदी केली. भाव वाढले असले तरीही बाजारात सोन्याच्या मागणीत तसूभरही फरक पडलेला नाही. येत्या काही दिवसांत परतावा चांगला मिळणार असल्याने, गेल्या काही दिवसांपासून बाजारात सोन्याच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.