Today Gold-Silver Price: देशात पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती रुपयांनी वाढले दर ?
आज मार्केटमध्ये 24 कॅरेट सोने 47,547 रुपये प्रति दहा ग्रॅमला विकले जात आहे, तर 22 कॅरेट सोने 43,553 रुपये प्रति दहा ग्रॅमला विकले जात आहे.
आज पुन्हा एकदा देशात सोने आणि चांदीचे दर (Gold-Silver Price) वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये आज सोन्याची किंमत 0.33 टक्क्यांनी वाढून 47,320 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे. त्याच वेळी, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, स्पॉट मार्केटमध्ये 24 कॅरेट सोने 47,547 रुपये प्रति दहा ग्रॅमला विकले जात आहे, तर 22 कॅरेट सोने 43,553 रुपये प्रति दहा ग्रॅमला विकले जात आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतीत 0.35 टक्के वाढ दिसून आली आहे. आज देशात चांदी 63,776 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. काल बाजार बंद झाल्यामुळे सोन्याचा दर 47,164 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा दर 63,587 रुपये प्रति किलो होता.
जागतिक बाजारात आज सोन्याच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे. स्पॉट सोन्याचे दर आज 0.3 टक्क्यांनी वाढून 1,815.16 डॉलर प्रति औंस झाले. यूएस सोन्याचा वायदा देखील 0.3 टक्क्यांनी वाढून 1,817.40 डॉलर प्रति औंसवर बंद झाला. दुसरीकडे, आज जागतिक बाजारात चांदीचे भाव 0.1 टक्क्यांनी कमी झाले. आज त्याचे दर 24.03 डॉलर प्रति औंस येथे नोंदवले गेले. प्लॅटिनमच्या किमतीतही आज 0.3 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. आज त्याचे दर 1,003.89 प्रति ट्रॉय औंस नोंदवले गेले. हेही वाचा Share Market Update: शेअर बाजाराने घेतली उसळी, सेन्सेक्सने प्रथमच 57,000 चा टप्पा केला पार, तर निफ्टी 17,000 जवळ
नवी दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,590 रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदीचा दर 63,500 रुपये प्रति किलो नोंदला गेला. कोलकातामध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,940 रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदीचा दर 63,500 रुपये प्रति किलोवर नोंदला गेला. चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 44,870 रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदीचे दर 68,400 रुपये प्रति किलोवर नोंदले गेले. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,490 रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदीचे दर 63,500 रुपये प्रति किलोवर नोंदले गेले.